(माढा येथे शासकीय विश्रामगृह येथे कर्ज वाटप आढावा बैठक पार पडली)
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांनी दिनांक १२जानेवारी रोजी माढा येथील शासकीय विश्रामगृह येथे सर्व बँकांची कर्ज वाटप आढावा बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी रब्बी पिके कर्ज वाटप लक्षांक तत्काळ पूर्ण करून घेण्याबाबत सूचना केल्या. एकही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही यांची काळजी घेण्याचे सांगितले. पीक कर्जाबरोबरच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या तक्रारीचे निवारण केले. पीक कर्ज वाटप उपक्रम माढा, टेंभुर्णी, मोडनिंब, कुर्डुवाडी येथे कॅम्प घेण्याचे सूचना केल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले
बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण बँक, बँक ऑफ बडोदा, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ महाराष्ट्र अशा अनेक बॅकांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माढा सहाय्यक निबंध सहकारी संस्था अनिकेत शिंदे, तालुका कृषी अधिकारी चंदन तसेच जि.प.सदस्य मभारत आबा शिंदे, भारत नाना पाटील, राजाभाऊ चवरे, शहाजी साठे,गुरुभाऊ कानडे,दिनेश जगदाळे, विनंती कुलकर्णी, रामकाका मस्के, बाळासाहेब ढेकणे, सुरेश पाटील, बालाजी पाटील, कुरण गिड्डे, सोमनाथ गायकवाड, निलेश पाटील, आबा साठे, भैया खरात, सदाशिव टोणपे, संजय भोगे, अभिजीत उबाळे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या