चित्रा न्युज प्रतिनिधी
करमाळा- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी व महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांच्या पहिल्या विद्यार्थीनी क्रांतीकन्या मुक्ता साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन नगरसेवका सुवर्णा रोहिदास आलाट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मातंग एकता आंदोलन चे तालुका अध्यक्ष शरद भैय्या पवार व नगरसेवक रोहिदास आलाट यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहराध्यक्ष युवराज जगताप यांनी मुक्ता साळवे यांच्या निबंध व कार्याचा आढावा समाज बांधवास सांगितला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी विश्वराज आलाट, चेतन आलाट,बाबा करंडे, अभिजित मंडलिक, करण आलाट, दयानंद करंडे, बाळासाहेब आलाट, पांडुरंग जगताप, उध्दव आलाट, गणेश आलाट , सोनू आलाट, सागर आलाट, कमलेश आलाट उपस्थित होते.


0 टिप्पण्या