Ticker

6/recent/ticker-posts

खर्डा रोडची दुरावस्था रस्त्यात खड्डा की खडडयात रस्ता? रस्ता दुरुस्ती साठी 15 दिवसांचा अल्टिमेटल अन्यथा आमरण उपोषण करणार...सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ सदाफुलेंचा प्रशासनाला इशारा...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :-  जामखेड शहरातून जाणाऱ्या खर्डा रोडवरील खर्डा चौक ते अहिल्याबाई होळकर (चौफुला) चौकापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदर खड्डे अनेक वेळा बुजवण्यात आले असले तरी रस्ता सुरळीत झालेला नसल्याचे चित्र आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून हा रस्ता पूर्णपणे नव्याने करण्याची गरज असल्याची मागणी नागरी कातुन होत आहे.
        खड्डे बुजवताना मुरुमाचा वापर केला जात असल्याने परिसरात धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या धुळीमुळे शेजारील रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे वाहने जाताना घरांना हादरे बसत असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
याशिवाय या रोडवरील एवन कॉर्नर जवळ बसवावेत, गतीरोधक जेणेकरून वळणावरून वाहने सावकाश जातील व अपघात टळतील, अशी मागणी करण्यात आली आहे. खड्डे बुजवण्याऐवजी खर्डा चौक ते अहिल्याबाई होळकर (चौफुला) चौकापर्यंत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावरील डिव्हायडर काढण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल विठ्ठल सदाफुले यांच्या वतीने करण्यात येत असुन सदर कामे १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जामखेड तहसील कार्यालय, समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या विषयाबाबत तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपअभियंता यांच्या कार्यालयात निवेदनाची प्रत देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या