•महिला व बालकल्याण विभागाचा अफलातून प्रकार
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी:- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना १ हजार पाचशे रुपये असा आर्थिक लाभ डिबीटीद्वारे मिळत असलेतरी सौ.आशा मनोज शेंडे वय-४० मौजा-निलागोंदी, तालुका लाखनी येथे वास्तव्यास असलेल्या भूमिहीन महिलेच्या नावावर शेतजमीन तसेच चारचाकी वाहन दाखवून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनाच्या आर्थिक लाभापासून अपात्र करण्याचा प्रकार महिला व बालकल्याण विभागाकडून उघडकीस आला. सौ.आशा शेंडे हिने नारी शक्तीदुत पोर्टलवर अर्ज भरून ते मंजूर झालेले होते तसेच डिबीटी तयार झाली होती पण चुकीच्या प्रणालीमुळे सदर भूमिहीन महिलांच्या नावाची तपासणी केली असता शेतजमीन व चारचाकी वाहन दिसून आल्याने सदर महिलेला अपात्र करण्यात आले असता अपात्र महिला या प्रादेशिक परिवहन विभाग तसेच महसून विभाग यांच्या कडून लेखी पुरावे सादर करून सुध्दा दुरुस्ती केल्यावर दीड वर्षाच्या कालावधीत "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनाच्या आर्थिक लाभापासून वंचित राहिल्याने मुख्यमंत्री ची बहीण केव्हा होणार याची प्रतीक्षा करीत आहे.


0 टिप्पण्या