चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी(श.प्र.):-सिद्धार्थ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावरी/ मुर. येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोज सोमवार ला संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक श्री. विजय रिनाइत तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका कु. मनीषा सुखदेवे होते. या प्रसंगी अध्यक्षांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. सदर कार्यक्रमाला विद्यालयातील अध्यापक श्री. मनोज खोब्रागडे, हमीद मेमन, विकास काशीवार, शिरीष लोगडे, भरत राऊत, अध्यापिका सौ. वंदना आगाशे, कु. कविता साठवणे, कु. स्वाती खोटेले प्राध्यापक श्री. सुभाष ठाकरे, आशिष सिंगनजुडे, कु. प्रतिभा अगडे, स्मिता आगाशे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या