Ticker

6/recent/ticker-posts

जामखेडमध्ये २.३५ लाखांचा गुटखा जप्त; दोन आरोपींवर गुन्हा दाखल...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- दि. २४ फेब्रुवारी २०२६
जामखेड शहरातील बीड रोड परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू साठा जप्त करत जामखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण २ लाख ३५ हजार ८४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास बीड रोडवरील ‘जय भगवान बाबा गोळी सेंटर’ येथे छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत साठा जप्त केला.
या प्रकरणी छबू विश्वनाथ तोंडे (वय ६५, रा. सत्तेवाडी, ता. जामखेड) व निलेश श्रीराम कोल्हे (वय ३५, रा. राजुरी, ता. जामखेड,
 सध्या रा. शिवाजीनगर, जामखेड) यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १००/२०२६ नोंदविण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७२, २७४ व २७५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जामखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सपोनि वर्षा जाधव मँडम या करीत आहेत.प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या