Ticker

6/recent/ticker-posts

अ.भा.आदिवासी विकास परिषदेच्या वतीने ड्रेफूल आत्राम, किशोर शेडमाके व प्रशांत उईके यांच्या नियुक्त्या !



चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर :-अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून माजी सैनिक ड्रेफुल आत्राम ,  चंद्रपूर शहर महानगराध्यक्षपदी किशोर शेडमाके तर जिल्हा शहर युवा अध्यक्षपदी प्रशांत लोमेश उईके यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
 देशपातळीवरील एकमेव सामाजिक संघटना असलेले 1966 -1967 मध्ये केंद्र शासनाची मान्यता प्राप्त आदिवासींची एकमेव सामाजिक संघटना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा चंद्रपूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून माजी सैनिक ड्रेफुल आत्राम यांची निवड संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम यांनी त्यांना नियुक्त पत्र देऊन करण्यात आली त्याचप्रमाणे चंद्रपूर शहर महानगराध्यक्षपदी  किशोर शेडमाके यांची निवड करण्यात आली या शिवाय चंद्रपूर जिल्हा युवा शहराध्यक्षपदी प्रशांत लोमेश उईके यांची निवड करण्यात आली, सर्व नियुक्त पदाधिकारी राष्ट्रीय संघटना असलेल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेचे काम जोमाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सर्वांनी एक दिलाने या संघटनेचे काम करून जिल्ह्यात क्रमांक एकची संघटना करण्याचे आश्वासन दिले असून जोमाने जिल्हा तालुका स्तरावर नव्याने संघटन बांधणीचे काम करण्यात येणार असून सुशिक्षित बेरोजगार, युवकांच्या समस्या, विद्यार्थी यांच्या समस्या तसेच शेतकरी शेतमजूर यांच्या समस्या सोडवण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे ठरवले आहे. आदिवासीच्या बिंदू नामावली तसेच नोकर भरती संबंधात पावले उचलण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने ठरविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद तिराणकर, संघटनेचे सर्व सचिव रवींद्र मेश्राम,जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके, किशोर शेडमाके, प्रशांत उईके  आदि मंडळी उपस्थित होती. संघटनेच्या जेष्ठ पदाधिकारी मंडळींकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या