Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावतीच्या आदर्शनगरात प्रथमच साजरी केली शिवजयंती

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती:- सुमठाना येथील आदर्शनगर खापरी वॉर्डातील सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्रित येवून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती द्वारा शिवजयंती प्रथमच उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली..
        कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी आर. एस. चीवंडे, प्रमुख मार्गदर्शक से. नि. मुख्याध्यापक गजानन घुमे, प्रमुख अतिथी म्हणून न. प. चे नियोजन सभापती राहुल सोनटक्के, माजी नियोजन व बांधकाम सभापती निलेश देवईकर, उत्सव समितीचे अध्यक्ष उईके यांची उपस्थिती लाभली होती.
       याप्रसंगी प्रमुख वक्ते गजानन घुमे बोलताना म्हणाले,महाराजांच्या शिवाजी या नावात शिकण्याची, वाचण्याची व जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, ही प्रेरणा तेवत ठेवण्यासाठी उत्सव साजरे करण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी न्यायनिष्ठ राज्यकारभाराच्या परंपरेची आधुनिक चौकट म्हणजे आपले संविधान होय. संविधानाचे आदरपूर्वक पालन करणे म्हणजेच शिवरायांना आदरांजली ठरेल असे आवाहन केले.
     याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्यlवर प्रकाश टाकणारी भाषणे व स्फूर्तिदायी नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री जीवने, प्रास्ताविक माधुरी देवईकर आणि आभारप्रदर्शन लक्ष्मी व्यंकटेश कोरवन यांनी केले.कार्यक्रमाच्या
यशस्वितेसाठी इस्माईल खान, मनोज मोडक, बी. एस. देशभ्रतार, सुनंदा गवई, प्रिती राजन, मनिषा दयालपवार , प्रिती बोधेले, बावणे, लोखंडे, लेडांगे, कुटेमाटे, शेंडे, धोपटे, चिटमलवार,इंगळे, वानखेडे ई. नी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या