Ticker

6/recent/ticker-posts

पोरगी काही मिळेना... लग्न काही जुळेना...

पोरगी काही मिळेना... लग्न काही जुळेना...

काल परवा मला एका नातेवाईकाचा फोन आला होता.  हॉलो... बोला दादा कसा काय?  फोन केला. तो म्हणाला काही नाही सहज केला होता. म्हटलं होत कि तुमच्या एखादी मुलगी लक्षात आहे काय बा असं विचारत होतो. मी म्हटलं कुठं आहे मुलगा काय करते अशी मी विचारण केल. तो सांगु लागला माझाच जवळचा नातेवाईक आहे. त्याच शहरा एक मोठे सहा - सात चेअरचे सलोन आहे. महिन्याचे किराया खर्च वजा करता एक ते सव्वा लाख कमावतो. ते ठीक आहे.पण कस आहे भाऊ पोरीवाले धंदेवाला म्हटलं कि लईच भाव खाते ठिक आहे. सांगतो नंतर असं बोलून वेळ काढूपणा करतो.....  कारण त्याला नोकरीवाला मुलगा पाहिजे. पण एकदम नाही म्हणत नाही हे मात्र तेवढं खर... 

पंचेविस - तिस वर्षा पुर्वी असा दिवस होता. कि एखाद्या सलुनमध्ये मुलगा कारागीरी करीत असला तरी  खुशीने पोरीचा बाप पोरगी द्यायला तयार असायचा पण आज असे राहले नाही. पोरगी देता काय पोरगी ....पोरगी काही मिळेना... लग्न काही जुळेना ... अशी आजची अवस्था झाली आहे. भाऊ....

याचे खरे कारण आहे मुलगा मुलगी यांच्या प्रमाणात असमतोलता. शंभर मुलांच्या मागे अंशी ते पंच्यांशी मुली असतील तर मुलींच्या अपेक्षा जास्त राहणारच. याला कारणीभूत समाजाच आहे गेली अनेक वर्ष मुलगी नको, मुलगी नको, वंशाला दिवाच पाहिजे त्याचे हे परिणाम. अनेकांना कटू वाटेल पण हे परखड सत्य आहे. त्यामुळे ज्या मुली लग्नाला आल्यात त्यांच्या अपेक्षाही खूप आहेत पण काही वर्षांपूर्वी हीच अवस्था मुलांची होती. या करताच म्हणत असावेत *"मै समय सबसे बलवान हू"*

आजकाल सर्वांना नोकरी पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त तरुणाई नोकरी साठी अभ्यास करत असतात…त्यात जास्त वय कधी होते काही कळत नाही. आणि नोकरी सुद्धा लागत नाही कारण कितीही म्हटलं तरी एक वास्तविक आहे. दहा हजार जागा आहेत आणि एक लाख फॉर्म आले. तर त्यातील दहा हजार लोक लागतील बाकी सर्व बेरोजगार आणि आज काल बेरोजगार लोकांना कुणीही पोरगी देत नाही…ही वस्तुस्थिती आहे...

*मुलींची अवास्तव अपेक्षा हे कारण आहे.*

मुलगा एकटाच हवा, आईवडील नको, बंगला हवा, चारचाकी हवी, डॉक्टर हवा किंवा सरकारी नोकरी हवी, शेती हवी या अपेक्षेमुळे मुलाना मुली मिळत नाहीत. आणि या अपेक्षाना मुलीचे आईवडील भर घालतात व मुलगी ३० -३२ ची झाली तरी लग्न करत नाहीत.
एकेदिवशी मुलगी पळुन गेली की बसतात चोळत हे वास्तव आहे.
त्यात स्त्री आणि पुरुष हे दोघेही तितकेच महत्वाचे आहेत. हे ज्यांना मान्य असते तिथे लग्नासाठी फारशा अडचणी येत नाहीत. मानवाचे अस्तित्व देखील स्त्री पुरुष मिलनाने टिकून राहणार आहे. त्यामुळे लग्न ही सामाजिक प्रथा हळूहळू कालबाह्य झाली तरी आश्चर्य वाटायला नको. अलीकडे केवळ आई किंवा केवळ पिता असलेली मुले देखील समाजात स्वीकारली जातात. पूर्वीसारखे वाळीत टाकणे हा प्रकार शिक्षणामुळे समाज प्रगल्भ झाल्याने असे प्रकार आता शहरांतून बंद होऊ लागले आहेत. तरीही अजून गावांत काही प्रमाणात हे वातावरण आहे. लवकरच हेही बदलेल.

मुळात प्रेम आणि लग्न या पूर्णत: व्यक्तिगत बाबी आहेत. पण समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी लग्न संस्थेचे उत्तरदायित्व जबाबदारीने सर्वांनी पाळले तरच टिकेल. अन्यथा नाही.

याला मुख्य कारण म्हणजे महागाई हे पहिले कारण आहे. लग्न करणे मुले वाढवणे आजारपणे हे सर्व खर्च सामान्यांच्या काय पण मध्यमवर्गीय लोकांच्याही आवाक्याबाहेर गेले आहेत.
दुसर वाढती बेरोजगारी - हे दुसरं प्रमुख कारण आहे. २०२१ मध्ये मोदी सरकारने पास केलेल्या नवीन लेबर कायद्यांमुळे कायम असलेली नोकरी कंपन्या केव्हाही टेम्पररी किंवा कॉन्ट्रॅक्ट वर शिफ्ट करू शकतात. यामुळे कोणताही खाजगी जॉब हा सुरक्षित नाहीये. त्यामुळे अनेक मुलींना मुलांच्या उत्पन्नाची खात्री वाटत नसल्याने लग्न करण्यात अशा मुलांना होकार मिळत नाहीत.

तिसरे लग्न म्हणजे स्वातंत्र्याचा लोप ही एक भावना तरुणांच्या मनात अलीकडे जास्त तीव्रतेने रुजू लागली आहे. त्यात काही प्रमाणात तत्थ्य देखील आहे.

चौथे प्रेम, आपुलकी, नाती यासारखी एकत्र बांधून ठेवणारी जिव्हाळ्याची नाती वाढत्या आर्थिक ताणामुळे संपत चाललेली आहेत. त्यामुळे आपण आहोत तसे बरे आहोत हे आजकालच्या तरुण तरुणींना वाटू लागले तर ते चूक वाटणार नाही. महिला शिक्षणाच्या जोरावर जॉब्स / लघुउद्योग करून स्वतःच्या पायावर उभ्या राहात आहेत. आर्थिक बाबीत स्वयंपूर्ण असल्याने लग्न ही गोष्ट मग दुय्यम होऊन जाते. लग्नापेक्षा मग लिव्ह इन रिलेशन जास्त सोपे वाटते. पटले तर लग्न करा नाहीतर नाते तिथेच संपवा. यात मला चुकीचे वाटत नाही. हुंडाबळी , सासरच्या लोकांनी छळणे, मारून टाकणे अशा कित्येक दशकांच्या कटू आठवणी आहेत. मग मुलींनी स्वतःच्या पायावर उभे असताना ही सावधगिरी बाळगली तर त्यात चुक वाटू नये.
-----------        ----------      -------

बॉक्स मध्ये

*या वरील सर्व बाबींवर एकच उपाय*

आपल्या मध्यमवर्गीय पालकांना मला सांगावस वाटते की आपल्या मुलींना आता  शिक्षणा सोबत त्यांना आपल्या आधुनिक सलोन व्यवसायाचे प्रशिक्षण देणे ही आजच्या काळाची गरज आहे. याचे कारण असं कि मुलींना  जास्त शिक्षण दिल्याने त्यांना त्यांच्याच योग्य तेचा जोडीदार निवडावा लागतो. मुलींना शिकवूच नका! असंही म्हणायचं नाही.  शिकवा पण व्यवसायीकही शिक्षण द्या. कारण कितीही शिकून सरकारी नौकरी मिळणे कठीण झाले आहे. मग काहीतरी जॉब म्हणुन एखाद्या खाजगी संस्थेत करावा लागते. पगारही जेमतेम पंधरा - विस हजार रुपये मिळतात. आजच्या या महागाई इतक्या पगारात घरातील खर्च, आरोग्य मुलांचे शिक्षण पुरेसे नाही. आपल्या आधुनिक पध्दती व्यवसायात महिन्याला एक ते दिड हजार रुपये कमावू शकतो. इतर समाजातील मुले - मुली मुलगी आपल्या व्यवसायाकडे वळून चांगले सलोन टाकून कमाई करतात मग आपल्या समाजातील मुला - मुलींना लाज कशाला व्यवसाय शिकल्याने दोन्ही पश्न सुटते यामुळे मुलीलाही  वाटेल कि आपल्यासाठी दुकानदारच मुलगा योग्य आहे. दोघेही जोडीदार एकत्र मिळून कमाई करू लागले तर दोघांचीही कमाई एकत्र जमा झाल्याने दोघेही आनंदी जीवन जगू शकतात आणि संसार सुरळीत चालू असल्याने दोन्ही कुटुंबाला समाधान मिळेल.

         राजेश येसेकर
मु. पो. ता. भद्रावती जिल्हा चंद्रपूर मो. 7756963512

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या