चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर:-पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संचलित सर्वधर्मीय जयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन, दसरा चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना 'शिव प्रेरणा' पुरस्कारा देऊन गौरविण्यात आले, तसेच क्रांतीकारी गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मीचे प्रमुख संतोष आठवले होते.
प्रारंभी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. धनंजय पठाडे व संतोष आठवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मान्यवरांचा गौरव आणि सत्कार
याप्रसंगी नूतन जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे व नूतन पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खालील मान्यवरांना 'शिव प्रेरणा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले:
चंद्रकांत भाट: उपसंपादक, दैनिक नवा महाराष्ट्र
भगवानराव धेंडे (पुणे): ज्येष्ठ साहित्यिक
सेनापती भोसले सर
विनोद सोमाजी जाधव (बुलढाणा): सामाजिक कार्यकर्ते
संतोषभाऊ शेंडगे (पिंपरी चिंचवड): सामाजिक कार्य
सदाशिव घाडीगावकर (विरार): सामाजिक कार्य
कृष्णात जाधव महाराज व स्तवन पेत्रस सोरटे व भगतसिंग शिलेदार (नवे दानवाड) यांचा सन्मान करण्यात आला
क्रांतीकारी गीतांची मेजवानी
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ज्येष्ठ गायक सुरेश सातारकर यांनी क्रांतीकारी गीतांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या गीतांमधून शिवरायांचा इतिहास आणि क्रांतीचा वारसा उलगडण्यात आला.
प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला दैनिक न्यायाची दंवडी संपादक विश्वास कांबळे मराठा स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय हरिराम देसाई, पँथर आर्मीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अरुण मेढे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ज्योतीताई झरेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, नितेश कुमार दीक्षांत, छाया सातारकर, लता गायकवाड, बबन तांदळे, राजू मोमीन आणि भैय्यासाहेब धनवडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मच्छिंद्र कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी तर आभार प्रदर्शन परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अमोल कुरणे यांनी केले.


0 टिप्पण्या