Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा गट व हंडरगुळी गणात "मामु" ची भुमिका ठरणार "टर्निंग पाॅईंट"

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—उदगीर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते,पुढारी,कार्यकर्ते यांचे लक्ष वाढवणा गटाकडे लागले आहे.कारण,मागचे सलग २ टर्म या गटावर इं.काॅं.उमेदवार विजयी झाला होता.म्हणुन यावेळेस हॅट्टट्रीक करावी,या भुमिकेतून इं.काॅं.पक्षातर्फे मात्तबरांनी कंबर कसलीय. तर हा गट ताब्यात घ्यावा, यासाठी भाजप-रा.काॅं.युती जीवतोड मेहनत घेताना दिसते.माञ,ओबीसी करता राखीव असलेल्या वाढवणा गटाचा भावी मिनी आमदार "मामु" च ठरवणार म्हणजे मागासवर्गीय व मुस्लिम समाजबांधव मतदार हेच ठरवू शकतात.अशी चर्चा आहे.म्हणुन यंदा "मामु" ची भुमिका "टर्निंग पाॅईंट" ठरु शकते.यात शंका नाही.
वाढवणा गटात "हॅटट्रीक" व्हावी,यासाठी काॅंग्रेसवाले "तुम तो ठहरे परदेशी" अशी "कॅसेट" वाजवित आहेत. तर गत २ टर्म मध्ये काॅंग्रेस उमेदवाराने गटात कुठे,कुठे विकासाची कामे केली?व कितीजणांचे "कल्याण" केले?अशा चर्चा मतदारांत होत आहेत.दुसरीकडे माञ भाजप-रा.काॅं.तर्फे केंद्र व राज्य शासनातर्फे करणारे व केलेल्या विविध विकास योजनांवर भर देत अत्यंत शिस्तबध्द प्रचार सुरु आहे. ही निवडणुक शेवटच्या टप्प्यात असून डावपेच,शह काटशह सुरु असलेतरीही गत २ टर्म मध्ये या गटामध्ये कोण,कोणती विकास कामे केली?आणि भविष्यात कोण,कोणती करणार.हे इं.काॅं.तर्फे सांगणे मतदार संघाला अपेक्षित होते.परंतू, इं.काॅं.तर्फे "परका" व "तुम तो ठहरे परदेशी" यावरच जोर देण्यात येत असल्याने मतदारांत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.तर भाजप युती तर्फे लाडकी बहीण योजना व अन्य मुलभुत,पायाभुत सुविधांसह विकासकामांचा दाखला देत विकास,विश्वास व स्थैर्य या ञिसुञीवर ठाम असल्याचे भाजप-रा.काॅं. युती मतदारांना पटवून देताना दिसते.असे एकुण वातावरण वाढवणा गटात असलेतरी ही उमेदवारांचे भवितव्य हे माञ "मामु"च्या हातात आहे.हे कुणीही नाकारु शकत नाही.
कारण,गत २ टर्म मध्ये "मामु" म्हणजे "मागासवर्ग व मुस्लिमवर्ग" हा एकगठ्ठा पडल्याने इं.काॅं.पक्ष विजयी झाला होता.पण गत २ टर्म मध्ये या गटात कुणाचे किती "कल्याण" झाले.व कितीविकास झाला.याचीच चर्चा'मामु'सह हंडरगुळी गण व वाढवणा गटात होत असल्याने वाढवणा हा गट तालुक्यात लक्षवेधी ठरतोय.
———————————
हंडरगुळीत सचीन साठे व पाशा पटेल यांची सभा संपन्न.....
वाढवणा गटातील भाजप महायुतीचे उमेदवार रामचंद्र तिरुके,गणातील सौ.मनिषा मुंडकर आणि हंडरगुळी पं.स. गणातील विक्की भोसले यांच्या प्रचारार्थ आण्णाभाऊ साठे यांचे नातु सचीन साठे,मा.आ.पाशा पटेल यांची जाहीर सभा साठे चौकात दि.३ रोजी राञी ९ वा. संपन्न झाली.यावेळी हजारो मतदार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या