चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :- दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा), ता. जि. भंडारा द्वारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा येथे वार्षिक स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई व वीरांगना महाराणी अवंतीबाई यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच सुभाष दमाहे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष किसन गजभिये होते. प्रमुख उपस्थितीत बाणाभाऊ सव्वालाखे (पं.स. सदस्य), सोविंदा माहुले (अध्यक्ष तं.मु. समिती), माजी पोलीस उपनिरीक्षक ललित टिकारीया, संस्था सचिव हिरालाल गजभिये, माजी पोलीस निरीक्षक सोमेश्वर शेंद्रे, प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे (साहित्यिक व नाट्यअभिनेता), संपादक तथा वरिष्ठ पत्रकार संतोष लांजेवार, पोलीस पाटील कुवरसिंग दमाहे, एकराम दमाहे (अध्यक्ष परमात्मा एक सेवक मंडळ), तसेच ग्रामपंचायत सदस्य जीवन दमाहे, नरेंद्र बंधाटे, राहुल तांडेकर, लता उपराडे, वंदना शहारे, सुरेखा बंधाटे, उषा दमाहे, अल्का दमाहे, कोठीरामजी दमाहे (माजी पं.स. सदस्य), आत्माराम बागडे (नामवंत शाहीर), गजानन बंधाटे, सोविंदा मेश्राम, हरिभाऊ मेश्राम, राजेंद्र पटले, रमेश शेंडे, प्रा. ईस्तारी पडोळे, प्राचार्य चरणदास बावणे, मुरलीधर पवणकर, प्रमोद थोटे, राजकुमार कांबळे, शाम जगनाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारात मार्च २०२५ च्या परीक्षेत इयत्ता १० वी व १२ वीमध्ये प्रथम क्रमांक जयश्री दमाहे, रूचिता दमाहे, द्वितीय अस्मिता खैरे, अंजली सव्वालाखे, तृतीय स्वेता सातक, प्रगती सव्वालाखे, तसेच प्रोत्साहनपर आवेश देवगडे व राज्यस्तर कुस्ती स्पर्धेत सहभागी विद्यार्थी सागर दमाहे यांचा मेडल देवून गौरव करण्यात आला. बौद्धिक व क्रीडा स्पर्धांतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
सेवानिवृत्ती सत्कार
मुख्याध्यापक नरेंद्र गणविर हे नियत वयोमानानुसार ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा संस्था अध्यक्ष किसन गजभिये, शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग व जे.एम.पी.सी. गृप १९८७-८९ चा मित्र परिवार यांच्या वतीने सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जयश्री दमाहे, अपूर्वा दमाहे, दिव्यानी बिरणवार व इयत्ता ८ ते १२ वीतील विद्यार्थ्यांनी राणी अवंतीबाई, तथागत गौतम बुद्ध, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फोटो असलेल्या भेटवस्तू प्रदान करून सद्भावना व्यक्त केली. यावेळी पत्नी वर्षा गणविर, मुलगा अंकूर गणविर तसेच आप्तेष्ट अपूर्वा गजभिये, मृणाली कान्हेकर व स्नेहांश कान्हेकर उपस्थित होते. रमेश शेंडे, सहा. शिक्षक राष्ट्रमाता इंदिरा गांधी हायस्कूल मांडेसर यांचा सुध्दा संस्थेच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात राजस्थानी, देशभक्तीपर, कोळी, शेतकरी नृत्य तसेच नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, कैलास मेश्राम, अनिता देवगडे, कौशल बंधाटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन दिनदयाल दमाहे यांनी केले तर आभार प्रदर्शन नानाजी गजभिये यांनी केले. यावेळी जे.एम.पी.सी. ग्रुप १९८७-८९ चा मित्र परिवार, पालकवर्ग, परिसरातील नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या