Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी येथे जैन कलार समाजाच्या ‘स्नेह मिलन’ सोहळ्याचे आयोजन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी: जैन कलार समाज, लाखनी यांच्यावतीने शनिवार, २८ फेब्रुवारी  रोजी दुपारी २.०० वाजता जैन कलार समाज भवन, लाखनी येथे “स्नेह मिलन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ, नागपूर प्रणित या कार्यक्रमात समाजबंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
           या स्नेह मिलन सोहळ्यास जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ, नागपूर येथील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अध्यक्ष चंद्रशेखर आदमने, उपाध्यक्ष शशिकांत समर्थ व विलास हरडे, सचिव कार्तिक शेंडे, सहसचिव विनोद खानोरकर व राजेश पालांदूरकर, कोषाध्यक्ष रविकांत हरडे तसेच माजी अध्यक्ष अनिल अहीरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तसेच संचालक विजय आदमने, शैलेंद्र दहीकर, अक्षय तिडके, स्वप्नील समर्थ, चंद्रशेखर तिडके, संजय शिरपुरकर, सचिन दहीकर, मोरेश्वर मानापुरे, अशोक रणदिवे, सौ. डॉ. छायाताई दुरूगकर, सौ. माधुरीताई घोसेकर, दिलीपजी राहाटे, विनोद भांडारकर, सुखरामजी खोब्रागडे, दिलीप मानापुरे, भूषण समर्थ, अजय लाड, नरेंद्र पालांदूरकर, विनोद खेदीकर आदींसह जैन कलार समाज जिल्हा समिती भंडारा येथील पदाधिकारी व पाहुणे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या माध्यमातून जैन कलार समाज बांधवांची भेट, विचारांचे आदान-प्रदान, परस्पर परिचय आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे. समाजाच्या प्रगतीसाठी सहकार्याची भावना दृढ व्हावी, यासाठी हा स्नेहमेळावा महत्त्वपूर्ण ठरणारआहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन व ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले आहे. समाजबंधू-भगिनींनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जैन कलार समाज, लाखनी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या