शिकारीच्या शोधात असलेला बिबट जेरबंद
•दिघोरी-नान्होरी शिवारातील घटना
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी:- मागील हप्त्यात दिघोरी-नान्होरी शिवारातील परिसरात एका वन्यप्राणी बिबट्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले पण त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा लाखनी वनपरिक्षेत्र येथील सहवनक्षेत्र लाखनी बिट रामपुरी हद्दीतील मौजा दिघोरी-नान्होरी येथील परिसरात (ता.२० फेब्रुवारी) रोज शुक्रवारला येथील शेतकऱ्यांला काम करीत असताना वन्यप्राणी बिबट हा शिकारीच्या शोधात भटकत असताना सुस्त अवस्थेत दिसला असल्याने ही माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. सदर माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, लाखनी हे आपल्या अधिनस्त वनरक्षक व वनकर्मचा-यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकांच्या जमावास वन्यप्राणी संघर्षापासून हानी होवु नये, याकरीता योग्य सुचना देण्यात आले. तसेच सदर बचाव कार्याबाबतची माहिती उपवनसंरक्षक, भंडारा व सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, सं व अ.नि.), साकोली यांना देण्यात आली.त्यानंतर वन्यप्राणी बिबट याचे बचावकार्य करण्याकरीता वन्यप्राणी बचाव दल (शिघ्र कृती दल) भंडारा वनविभाग, भंडारा यांचे चमुस घटनास्थळी पाचारण करण्यात आले असता त्यांनी घटनास्थळाची पहाणी करुन वन्यप्राणी बिबट यांस जेरबंद करणे आवश्यक असल्याने पिंजरा लावुन त्यामध्ये वन्यप्राणी बिबटास यशस्वी जेरबंद करण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर श्री.विठ्ठल हटवार पशुवैद्यकीय अधिकारी, कनेरी यांनी जेरबंद करण्यात आलेला बिबटवर तात्पुरता उपचार करून पुढील उपचारासाठी गोरेवाडा नागपूर न्यावे असा अहवाल दिल्याने त्याला नागपूर याठिकाणी नेण्यात आले. सदर वन्यप्राणी बिबट बचाव कार्य मा.योगेंद्र सिंग, उपवनसंरक्षक, भंडारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय मेंढे, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, सं व अ.नि.) साकोली, श्री. सचिन निलख, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) भंडारा, श्री. सुभाष बारसे पोलीस निरीक्षक लाखनी, श्री.नितेश धनविजय वनपरिक्षेत्र अधिकारी, लाखनी, श्री. शुभम मोदनकर जिवशास्त्रज्ञ, वनपाल लाखनी, श्री.जितेंद्र बघेले, वनरक्षक श्री सचिन कुकडे,श्री. बालाजी कदम, नितीन उशीर,वाहन चालक श्री.अनिल शेळके, व RRT टीम चे सदस्य श्री. श्री.निशी वानखेडे ,श्री.नरेंद्र उर्कुडकर,श्री. अमोल नगारिकर, शरद ताईतकर तसेच गावकरी सरपंच, पोलीस पाटील यांच्या मदतीने सदर बिबट बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
वनविभागाचे नागरिकांना आव्हान
वन्यप्राणी संघर्षाची घटना उद्भवल्यास त्याबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती तात्काळ नजीकच्या वनाधिकाऱ्यास द्यावी.जेणेकरून मानव हानी च्या घटना टळू शकतील, असे आवाहन भंडारा वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या