चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :- शिक्षण विस्तार अधिकारी अस्लम इनामदार यांनी वेळापूर मुली शाळेस भेट दिली, यावेळी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली, शाळेची उत्कृष्ट गुणवत्ता,उच्चविद्याविभूषित शिक्षक वृंद स्वच्छ सुंदर परिसर, वृक्षारोपण, संगणक कक्ष, पिण्याची RO सुविधा, शाळेचा वाढत असलेला पट व गुणवत्ता याची माहिती घेतली कौतुक केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थीनीशी सुसंवाद साधला. मार्गदर्शन केले. निपुण भारत, सायकल बँक, आदींची माहिती घेतली
.विविध स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन कौतुक केले. शाळेची गुणवत्ता आदर्शवत आहे असेही म्हणाले
यावेळी केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईकनवरे यांनीही शाळेविषयी गौरवोद्गार काढले
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीणकुमार पांगे यांनी केले
कार्यक्रमासाठी श्री.जीवन रणनवरे, श्रीमती आसराबाई जैन मॅडम,श्री पांडुरंग कुलकर्णी, श्रीमती किरण घाडगे मॅडम, सौ. कविता आवटे मॅडम, शिक्षक उपस्थित होते*.


0 टिप्पण्या