चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-नुकत्याच संपन्न झालेल्या जि.प.निवडणुकीत जिल्ह्यात विविध ठिकाणी हटके रिझल्ट लागले व रेकाॅर्ड झाले.
माञ,उदगीर तालुक्यातील वाढवणा गटातून भाजप-रा.काॅं. युतीतर्फे विजयी झालेले रामचंद्र तिरुके या उमेदवाराने 'अजब-गजब" हॅटट्ट्रिक केल्यामुळे लातुर जिल्ह्यात याबद्दल चर्चेला उधान आले आहे.याचे कारण म्हणजे स्व:ताचे मत व गाव नसतानाही २०१२ ला तोंडार,२०१७ वलांडी आणि आता २०२६ मध्ये वाढवणा असे वेगवेगळ्या जि.प. गटातून विजयी होत वाढवण्यात प्रथमच भाजपचा झंडा फडकावला त्या रामभाऊ तिरुके यांनी सलग ३ निवडणुकीत अलग-अलग गटातून विजयी होण्याची अजब-गजब अशी हॅटट्ट्रीक केली व भाजप-रा.काॅं. युतीच्या गल्ली ते दिल्लीच्या नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वाढवणा म्हणजे इ.काॅं.चा अभेद किल्ला.कारण ९२ मध्ये स्थापन झालेल्या या किल्ल्यावर (जि.प.गट) २६ पर्यंत एकदाही भाजपचा विजय झाला नव्हता. म्हणुन इं.काॅं.वाले बिनधास्त होते.पण गत १० वर्षात जि.प. मध्ये विजयी झालेल्या इं.काॅं.च्या सदस्याने गटाचे किती "कल्याण" केले?हा चर्चेचा विषय ठरला. आणि याचा फटका इं.काॅं.च्या उमेदवाराला बसला आणि या गटावर प्रथमच भाजप चा झंडा फडकला.


0 टिप्पण्या