विरूर पोलिस स्टेशनला केली 420 चा गुन्हा दाखल करण्याची तक्रार .
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरू र स्टेशन येथे नभुक्र. 478 ही जागा सरकारी चाड असे उल्लेख भूमिलेखच्या मुळ नोंदवाहीमध्ये नोंद असून विरूर स्टेशन येथे ही जागा कुठे गायब झाली याचा भानच नाही.काही काळा अगोदर करोडगीरी नाक्याचा जागेवर आठवडी बाजार सुद्धा भरत होता.आजही सदर जागेवर ग्रामपंचायतचे भवन (बैंक ऑफ इंडिया) व ग्रामपंचायतची विहीर निशानी म्हणून मौक्यावर आहे.नागरिक स्वतः परेशान आहेत की ही जागा गेली तर गेली कुठं सदर त्या जागेवरील जिल्हा परिषद शाळा व पोस्ट ऑफिस व काही जागा फॉरेस्टची अशी होती. परंतु सध्या ती राजकिय पदाधिका-याने राजकिय दबावाखाली अजय रेड्डी यांनी शासनाची दिशाभूल करून ती जागा नगर भुमापन क्र.378 अशी दाखवली आहे.
नगर भुमापन क्र. 378 ही जागा जयराम पाटील मोरे यांचे कडुन सर्वे नंबर 141,142 पैकी 64 गुंठे खरेदी केल्याचे नोंद आहे.परंतु 64 गुंठे खरेदीची नोंद 84 गुंठे अशी दाखवत आहे. भुमी अभिलेख विभागाचा आखिव पत्रीकेत 20 गुंठे वाढवण्याचे उल्लेख सुद्धा आहे अशी हेराफेरी कशी काय केली हा मोठा प्रश्न आहे तरी तहसील कार्यालय पंचायत समिती विरूर पोलीस स्टेशन ग्रामपंचायत इथे पुराव्यासहित तक्रार नोंदणी केली असून शासनाने त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान 420,467,468 अन्वये गुन्हा दाखल करावा.अशी विरूर स्टेशन येथील नागरिकांचे मागणी आहे आणी ग्रामपंचायत कमेटीने वारंवार ठराव घेऊन करोडगीरी नाक्याची शासकीय जमीन भविष्यात कधिच फेरफार न करण्याचे संकेत दिले असता, ग्रामपंचायत कमेटीला अंधारात ठेवून तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपाल नैताम यांनी ठराव न घेता कार्यवाही वॄत्तांत न लिहता राजकीय दबावामुळे ग्रामपंचायत मालमत्ता अभिलेखात परस्पर नोंद घेतली. मालमत्ता क्रमांक 397/3 असे दाखवून काही व्यक्तींना विक्रीपत्र सुद्धा करून दिली आहे अशी चुकीचे काम अजय रेड्डी त्या व्यक्तीने केले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावे अशी ग्रामस्थाची मागणी आहे.



0 टिप्पण्या