Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. प्राथमिक शाळा,दुर्गवाडाशिक्षण परिषद उत्साहात संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-मोर्शी शहरालगत असलेल्या दुर्गवाडा येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये पिंपळखुटा व पाळा केंद्राची शिक्षण परिषद दि.25/02/2026 रोजी उत्साहात पार पडली. या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष केंद्रप्रमुख मा.श्री.गजानन चौधरी होते.प्रमुख अतिथी स्थानी श्री. प्रवीण राऊत, श्री. कुशकुमार पाथरे, मंसूरी सर, अमित आहाडे विराजमान होते. कु. ज्योती डाफे, श्री. नितीन धुरे, कु. शुभांगी मेश्राम, कु. ममता भुजाडे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेला पिंपळखुटा व पाळा केंद्राचे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. अर्पिता साबळे, कु. सुहानी शेळके,सौ.अनिता चौधरी,सौ. कल्पना गौरखेडे, कु.प्रतिभा तरायकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुळा ठाकरे यांनी आभार प्रदर्शन कु. अर्पिता साबळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या