चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज : साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा असणारा 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्यिक पुरस्कार- २०२६', डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. सदानंद देशमुख, नारायण सुमंत यांना प्रदान करण्यात आला
येथील सहकार महर्षी कारखान्याच्या उदय सभागृहात झालेल्या गौरव सोहळ्यात श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे, प्रास्ताविकात साहित्य पुरस्कार समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी गत तीन वर्षापासून साहित्यातील दिग्गजांच्या सन्मानाबरोबरच नवीन पिढीसाठी वाचन संस्कृतीची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार देत असल्याचे सांगितले.
साहित्यिक पुरस्कार विजेते नारायण सुमंत पूर्वी शिक्षण हे व्यक्तिमत्व संपन्नता होण्यासाठी होते तर आताचे शिक्षण हे पॅकेजसाठी आहे आपले अकलूजमध्ये जन्मगाव असून इथल्या मातीचा संस्काराचा तत्कालीन सामाजिक सांस्कृतिकतेचा प्रभाव आपल्या कवितेतून उमटला. आपल्या शब्दात ताल चाल नियंत्रितपणा जिल्हा परिषद शाळेच्या शिस्तीने दिला. त्याकाळी रंगपंचमीला सप्तरंगी इंद्रधनुष्य उमटायचे आता मात्र सर्व रंग विकले गेले, वाटले गेले असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विशेष साहित्यिक पुरस्कार प्राप्त डॉ. सदानंद देशमुख यांनी आपला एक गुणग्राहक संस्थेकडून होत असलेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करीत आपण एका शेतकरी कुटुंबातील असून आईची लोकगीते तर वडिलांची शिस्त यामुळे घडले असल्याचे सांगितले. ज्या साहित्यातून वाचकाला तो स्वतः भेटतो असे साहित्य मोठे असून साहित्यकालातील कलात्मकता असावी वास्तवादी लेखन हे शाश्वत स्वरूपी असते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जागतिकी करण्यासाठी महत्त्वाचे कारण असून आपल्या वडील कायम बाबूशाहीचे उदाहरण देत कष्टाचे महत्त्व पटवून देत त्यांच्यासृष्टीमुळेच आपण घडलो असल्याचे सांगितले.
सूत्र संचलन विनायक सूर्यवंशी व रोहित देशमुख यांनी केले.


0 टिप्पण्या