Ticker

6/recent/ticker-posts

वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवात लोकसंस्कृतीचा जागर

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 लाखनी :-दोन दिवसीय वैशिष्ट्यपूर्ण लोक कला महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे दिनांक 13 व 14 फेब्रुवारी 2026 सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ पर्यंत पोवराई सभागृह आंधळगाव जिल्हा भंडारा येथे करण्यात आले होते. महोत्सवाचे प्रारंभ राज्य गीताने करण्यात आले व दीप प्रज्वलित करून मान्यवरांच्या हस्ते विधिवतपणे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभाग नागपूरचे सहाय्यक संचालक माननीय संदीप शेंडे साहेब अधीक्षक खडसे साहेब व ज्येष्ठ नाट्य कलावंत राम रतन खोकले, लोक कलावंत करवाडे, डॉक्टर हेमंत मते हे प्रामुख्याने उपस्थित होते. महोत्सवाचे प्रारंभ राज्य गीताने करण्यात आले व दीप प्रज्वलित करून मान्यवरांचा हस्ते विधिवतपणे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण लोक कला ही आपली प्राचीन पुरातन व पारंपारिक लोक कला आहे. महाराष्ट्रात अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण लोक कला आहे या लोककलेचा वारसा आपल्याला जपायचं असून त्यांचे जतन व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे व हीच आपली खरी संस्कृती आहे .अशा लुप्त झालेल्या लोककलेला वाव देण्याकरता व तरुण पिढीमध्ये लोककलेची आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करण्याकरता सांस्कृतिक मंत्री ऍडोव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांचा संकल्पनेतून त्याचप्रमाणे ही लोककला अधिकाधिक बळकट व वृद्धिगत व्हावी हा उद्देश ठेवून सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनातून व विभागाचे संचालक श्रीरामजी पांडे साहेब यांच्या  नियोजनातून वैशिष्ट्यपूर्ण लोक कलेचे आयोजन करण्यात आले होते .या दोन दिवसीय महोत्सवाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी जात्यावरच्या ,ओव्या किंगरी, डहाका व पारंपारिक आदिवासी नृत्य  इत्यादी कलेचे सादरीकरण झाले .तर दुसऱ्या दिवशी पांगुळ, फुगडी, व शेत गीत इत्यादी कलेचे सादरीकरण झाले रसिकांनी प्रत्येक कलावंताचे भरभरून कौतुक करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक संचालक नागपूर विभागातर्फे कलावंताचे व जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या