चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडारा तर्फे श्री सिद्ध चिंतामणी गणेश मंदिर, वेलकम कॉलनी,भंडारा येथे दिनांक २७.०२.२०२६ रोजी गटचर्चा घेण्यात आली.
प्रमुख अतिथी डॉ. जयश्री सातोकार यांनी मातृभाषा म्हणजे भावना व्यक्त करण्याचे माध्यम असे मत मांडले. अध्यक्षपद सौ. दीप्ती कुरोडे यांनी भूषविले.पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री श्री नितीन काकडे यांची विशेष उपस्थिती होती.याशिवाय रोजगार सृजन आयामाचे प्रांत पदाधिकारी श्री मिश्रा यांनी सपत्नीक भेट दिली. श्री. चंद्रशेखर साठे ,श्री विष्णुपंत पांडे,तसेच जिल्हा व नगर कार्यकारिणी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
चर्चेच्या शेवटी महिला दिन व ग्राहक दिन कसा व केव्हा घ्यावा यावर विचार विनिमय होऊन दिनांक ११ मार्च ला संध्याकाळी ४.३० मा.नगराध्यक्ष ,भंडारा न.प.यांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरले.
बैठकीचे संचलन श्री. अनिल शेंडे, जिल्हा सचिव यांनि केले
शेवटी श्री. रवींद्र तायडे यांनी सर्वांचे आभार मानले व सभा विसर्जित झाली.


0 टिप्पण्या