चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-सध्या खाजगी व सहकारी कारखाने ऊसाचे गाळप करत असल्याने परिसरात ऊसतोड व वाहतूक वाढली आहे.माञ,परवान्यापेक्षाही जास्त ऊसाची डबल ट्राॅली मधून होणारी ही वाहतूक जीवघेणी,धोकादायक आहे तरीही अशा वाहतूकीवर कायदेशीर कारवाई करावी, असे अद्यापही आरटीओ महाशयाच्या ध्यानी-मनी आले नसल्याने हंडरगुळी ते उदगीर रोडवर रेडियम अन् रिफ्लेक्टर नसलेले तसेच परवान्यापेक्षाही ओव्हरलोड ऊस भरलेले वाहने समोरचे २ ही चाके हवेत उडवीत ऊसाची वाहतूक करतानाचे चिञ कारखाने सुरु झाले तसे बघायला मिळते.विशेष म्हणजे बहूतांश वाहनांचे चालक अल्पवयीन,परवाना नसलेले दिसतात.तरीही या तालुक्याच्या बहाद्दर आर. टी.ओ.महोदयाने अद्याप कसलीही कारवाई केल्याचे दिसून आले नाही.तेंव्हा या रोडवर एखादा मोठा,डेंजर अपघात झाल्यावर पोलीस व आरटीओंचे नयन उघडे होतील?का,पट्टा पडल्यावर कारवाईसाठी आरटीओ हिंडतील?असे प्रश्न सजग नागरीकांतून विचारले जात आहेत.
ऊस वाहतूकीसाठी सर्रास २ ट्राॅलींचा व त्यात क्षमते पेक्षाही जास्तीचा ऊस दिसतो.अन्य वाहनांच्या छोट्या,छोट्या चुका काढून त्यांना मोठ,मोठ्या दंडाच्या पावत्या फाडणारे उदगीरचे आरटीओ ऊसाच्या अवैध वाहतूकीकडे अर्थपुर्ण असे दुर्लक्ष करत असल्याची शंका या रोडवर अद्याप कसलीच कारवाई केलेली नाही.म्हणुनच येते.
कारखान्याकडे जाणा-या सगळ्याच रोडवर रेडियम व रिफ्लेक्टर नसलेले ट्रॅक्टर्स परवाना नसतानाही दोन २ ट्राॅल्यांमध्ये क्षमतेपेक्षाही जास्त ऊस भरुन जातात.हे बघून या वाहनांकडे असा कोणता 'स्पेशल' परवाना आहे?व तो कुणी दिलाय? अशी चर्चा ट्रॅक्टर ट्राॅलीत नियमबाह्य भरलेल्या ऊसाकडे आणि ट्रॅक्टरमध्ये वाजणा-या साउंडकडे बघून सामान्य जनतेत होत आहे.
या बाबत आवाज उठवूनही कारवाई होत नसल्यामुळे संबंधित यंञणेच्या कामांवर संशय घेतला जातोय.



0 टिप्पण्या