चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी :- तुळसीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर येथील दुसरा दीक्षांत समारंभ अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन नागपूर येथे संपन्न झाला. या सोहळ्यात पदवी (UG Batch २०२५) आणि पदव्युत्तर (PG Batch २०२४-२०२५) अभ्यासक्रमाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला देशातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत लाभली होती त्यामध्ये मुख्य अतिथी माजी अध्यक्ष डॉ. टी. जी. सीताराम (अखिल भारतीय तकनिकी परिषद) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सन्माननीय अतिथी म्हणून पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. व्ही. जी. डांगरे तसेच तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. एम. बी. दैगव्हाणे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमात सहभागी राहून उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे नियोजन गायकवाड-पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड-पाटील, उपाध्यक्ष श्री. आकाश गायकवाड-पाटील, अध्यक्षा डॉ. अंजली पाटील-गायकवाड आणि कोषाध्यक्ष डॉ. संदीप गायकवाड-पाटील गायकवाड पाटील इंजिनिअर कॉलेज नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या प्रमुख डॉ. रोहिणी पोची यांनीही कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा विद्यार्थी शुभम सोपान निखाडे ठरला. शुभमने ९.३८ CGPA मिळवून कॉलेजमध्ये मुलांमधून 'ओव्हरऑल टॉपर' आणि 'ब्रँच टॉपर' होण्याचा मान मिळवला. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याला संस्थेचा मानाचा “Late Shri Tulsiramji Gaikwad-Patil Memorial Award” आणि गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले.शुभम सोपान निखाडे भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात खैरी/पिंपळगाव येथील ६०० लोकसंख्या असलेल्या एका लहान खेड्यात जन्माला आले असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले होते मुलाला मिळालेला गोल्ड मेडल याचा आनंद वडील सोपान रामेश्वर निखाडे,आई वंदना सोपान निखाडे हे आनंदाश्रू मावेनासे झाले.
शुभमने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबिय, शिक्षक आणि संस्थेला दिले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील यशाच्या संकल्पाने या सोहळ्याची सांगता झाली.



0 टिप्पण्या