Ticker

6/recent/ticker-posts

माझ्यावरील भ्याड हल्ल्यातील मारेकरी व सूत्रधारांना त्वरित अटक करा.

तेरे हाथ में तलवार है मेरे हाथो कलम 
बोल सर जुल्मो का तू काटेगा या मै काटू?

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई:-माझ्यासारख्या ज्येष्ठ व निर्भीड पत्रकारावर  जो निशस्त्र व बेसावध आहे, त्याच्यावर तीन तरुण व धडढाकट मारेकरी पाठवून बेदम मारहाण करण्यात आली  त्यात कसली आली मर्दूमकी. हा हल्ला गजबजलेल्या अश्या रस्त्याच्या मध्यभागी व दिवसाढवळ्या सकाळी अकरा वाजता झाला. या वरून हे भाडोत्री मारेकरी किती निर्ढावलेले व सराईत  गुन्हेगार होते? हेच सिद्ध होते.ज्या नराधम राजकीय विरोधकांनी त्यांना सुपारी दिली, ते किती कपटी व पाषाणहृदयी असतील, याची कल्पना येते.

माझी स्कूटर भर रस्त्यात अडवून दोन दांडग्या तरुण मारेकर्यांनी प्रथम स्कूटरवर असताना व नंतर मारहाणीमुळे खाली पडल्यावर देखील प्रचंड मारहाण केली त्यामुळे माझ्या हातापायला दुखापत झाली  व खंडूजा बसलं fracture झाले. ती सुपारीबाज गुंडच करू शकतात. त्यांचे आका किती सराईत क्रिमिनल minded असू शकतात हे दिसून येते.

माझ्या सडेतोड लेखन व पत्रकारितेस सामोरे जाऊ ना शकलेले लोक गुन्हेगारी मार्गाने माझी मुस्कटदाबी करू पाहणारे विरोधक मला पुरते ओळखत नसावेत. मशालीची पोत बळेच खाली केल्याने ती विझण्याऐवजी त्याच्या ज्वाळा उफाळून येतात. माझ्या लेखनाला पूर्णविराम माझ्या अंतानंतरच मिळेल. या मारेकऱ्यांना सुपारी देऊनच माझ्या विरोधकांनी पाठवले होते हे निर्विवाद सत्य आहे. ते एका दुचाकीवरून ट्रिपल सीट आले होते. तसेच त्या गाडीला नंबर प्लेटही नव्हती. या वरून ते सराईत गुन्हेगार होते, याबाबत पोलिसांचेही दुमत नाही. माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी रेकी करून माझी जाण्यायेण्याची वेलेवर पाळत ठेवली होती.

 त्यामुळे हा हल्ला पूर्व नियोजित कटाचा भाग असून त्यामागे मी "भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाणसाहेब यांना अनाहुत सल्ला" या लेखात धनंजय बोडारे यांना स्विकृत नगरसेवक पद का देऊ नये?  याची कारणमिमांसा केली होती. त्यामुळे चीडून जाऊन हा हल्ला केला असावा, असा माझा दाट संशय आहे. "*पोलिसांनी 120B अंतर्गत कटातील सहभागाबद्धल चौकशीसाठी सूत्रधारांना ताब्यात घ्यावे.*" मारेकरी हे बाहेरगावचे असावेत व त्यांना पळून जाण्यास या कटातील सूत्रधारानींच मदत केली असल्याने सूत्रधाराची चौकशी करणे आवश्यक आहे. तेच मारेकर्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकतात. परंतू पोलीस उलट्यादिशेने तपास करीत आहेत. 

हा माझ्यावरील वैयक्तिक हल्ला नसून एका ज्येष्ठ पत्रकारवरील सुनियोजित हल्ला आहे. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्या वरील व संविधानाने प्रत्येक नागरिकांस प्रदान केलेल्या "विचार स्वातंत्र्य,विहार स्वातंत्र्य, लेखन व भाषण स्वातंत्र्यवरील हल्ला आहे*. आरोपीना अटक हॊवून शिक्षा होणे हे त्यासाठीच आवश्यक आहे. आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील. या कठीण प्रसंगी ज्या पत्रकार व पत्रकार संघटना तसेच हितचिंतकांनी पाठींबा दिला त्यांच्या मी ऋणी आहे.

पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता निस्पक्षपणे तपास करावा ही अपेक्षा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या