Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा गटात बदलाचे वारे..!मतदारांच्या निर्णयाकडे लागले उमेदवारांचे लक्ष...


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-उदगीर तालुक्यात जि.प.७ व पं.स.चे १४ मतदार संघ आहेत.माञ,सर्वाधिक चर्चा आहे वाढवणा गटाची.कारण,हा गट गत १० वर्षा पासून इं.काॅं.च्या ताब्यात आहे.आणि यावेळी हा गट ताब्यात घेण्यासाठी भाजपा रा.काॅं.युतीने कंबर कसली असून माजी उपाध्यक्ष राम भाऊ तिरुके यांना गटातून तर हंडरगुळी गणातुन युवा, फ्रेश चेहरा म्हणुन विक्की भोसले याला आणि मनीषा मुंडकर यांना वाढवणा पं.स गणातुन उमेदवारी दिल्याने ही लढत तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे.गत २ टर्म इं.काॅं.च्या ताब्यात हा गट असून १२ ते १७ असे सलग पाच वर्षे जि.प.चे सभापती पद या गटाला इं.काॅं.पक्षाने दिले होते.माञ तरीही या गटाचे "कल्याण" झाले नसल्याने मतदारांमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे.म्हणुन या गटातील हाळी-हंडरगुळी या गावातील मतदारांच्या भुमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.कारण,गटात असलेल्या २५ हजार मतां- पैकी अर्धेअधिक मतदान या २ गावात आहे.आणि या गटात गत १० वर्षात कुणा कुणाचे "कल्याण" झाले. अशी चर्चा हाळीहंडरगुळीत सध्या जोरात सुरु आहे.या वेळच्या निवडणुकीत या गटात,गणात भाजप-रा.काॅं युती,शिंदेसेना व इं.काॅं.मध्ये तिरंगी सामना होत आहे.तर लोकसभेप्रमाणे यावेळेसही इं.काॅं.पक्षातर्फे नेरेटीव्ह पसरवला जात असून तो बुमरॅंग बनून इं.काॅं.वरच उलटू शकतो.कारण गत १० वर्षात कोणकोणत्या गावात कोण कोणती विकासाची कामे करुन मतदारसंघाचे किती "कल्याण" केले.हे सांगण्या ऐवजी परका उमेदवार असा प्रचार इं.काॅं.तर्फे केला जात असलातरी गत १० वर्षात खरे "कल्याण" कुणाचे झाले?याची जाण असलेला मतदार यावेळेस गटात बदल करण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. 

हाळीच्या व्यक्तीचाा सलग २ वेळेस इं.काॅं.कडून गटात विजय झाला.त्यात पहिले ५ वर्ष जि.प.चे सभापतीपद होते.तरीही या गटाचे सोडा हाळीचेच चांगले (कल्याण) केले नाही.म्हणुन यावेळेस बदल करण्याच्या तयारीत जनता आहे.अशी कुजबूज हाळीहंडरगुळीत सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या