Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात दिव्यांगांच्या नावाने दुकानदारी मांडणाऱ्या आणि सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या संस्थांना


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड:-आता पळता भुई थोडी झाली आहे. अॅक्शन मोडमध्ये असलेल्या तुकाराम मुंढे यांनी मोठा धडाका लावत राज्यातील तब्बल ९०० दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. धक्कादायक म्हणजे,
एकट्या २०२५ मध्ये ३६३ संस्थांवर गाज पडली आहे.
राज्यात #दिव्यांग व्यक्ती अधिनियम अंतर्गत दिव्यांगासाठी कार्यरत संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे #नोंदणी असणे अनिवार्य आहे. राज्यात साधारणत: दोन हजारांहून अधिक संस्था दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ९०० संस्था विविध कारणांमुळे अपात्र ठरल्याने त्यांच्यावर विभागाने कारवाई करून त्यांची नोंदणी रद्द केली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत divyangkalyan.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास संबंधित संस्थांवर अधिनियमातील कलम ९१ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सचिव मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या