Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामरोजगार साहाय्यकाचा जि. आर.कागदावरच


ग्रामरोजगार साहाय्यक १६ महिन्यापासून फिक्स मानधनाच्या प्रतीक्षेत


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.) :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक यांना सन-२००६ पासुन शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या ६% निधी मधुन मानधन दिला जातो,ग्रामरोजगार सहाय्यक हे ग्रामपंचायत अधिकारी यांना मदतनीस अशी नियुक्ती केली असलीतरी अलीकडे ग्रामपंचायत अधिकारी यांच्या बहिष्कारामुळे ग्रामरोजगार सहाय्यक हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मुख्य घटक बनले असून ग्रामसभेच्या माध्यमातुन नियोजन तयार करणे, गावामध्येच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे, त्यांचे हजेरीप्रत्रक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन काढणे, कामाच्या स्थळी जाऊन मजुरांची हजेरी घेणे आणि पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी हजेरीपत्रक सादर करणे, तसेच ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांना वेळोवेळी मदत करणे,शासनाच्या सर्वच घटकातील विविध योजनेचा प्रचार व प्रसार करण्याचा काम करीत आहे तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत येणारी  संपूर्ण दस्तवेज सांभाळत असलेतरी त्याची सेवा अर्धवेळ स्वरूपाची असून पूर्ण वेळ ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक काम करीत आहेत.ग्रामरोजगार साहाय्यकाला कामाचा व्याप वाढल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक ०३ ऑक्टो २०२४ रोजी ग्रामरोजगार सहाय्यकाचे मानधनात सुधारना करण्याबाबत जी.आर.निगर्मीत करून त्यात दोन हजार मनुष्य दिवसाच्या आधारावर ८ हजार फिक्स मानधन तसेच २ हजार प्रवास भत्ता व मोबाईल रिचार्ज जाहीर करून १९ वर्षाचा वनवास भोगणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यक यांचे अश्रू पुसण्यात आले परंतु आतापर्यंत दिनांक ०३ ऑक्टो २०२४ चा ग्रामरोजगार सहाय्यक मानधन सुधारना जी.आर.निगर्मीत होऊनही १६ महिन्याच्या कालावधी लोटूनही अंबलबजावणी करण्यात आलेली नसल्यामुळे ग्रामरोजगार साहाय्यकाचा जि.आर.कागदावरच असून इतिहास जमा होणार या शंकेला पेव फुटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या