Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची मौल्यवान व परिपक्व संपत्ती आहे-इंजी. मनोहर पोकळे

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ला महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उद्घाटक म्हणून संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तसेच सेवानिवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव जलसंपदा विभाग यांनी जेष्ठ नागरिक ही राष्ट्राची मौल्यवान व परिपक्व संपत्ती आहे त्यामुळे त्यांच्या समस्येकडे आपुलकीने लक्ष देणे शासनाचे आद्य कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. 
कर्मचारी भवन प्रशासकीय इमारत राष्ट्रीय महामार्ग भंडारा येथे महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री माधवराव फसाटे अध्यक्ष जिल्हा भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यामध्ये राज्य कार्यकारिणीचे श्री टी .के. गुरव सरचिटणीस ,पुणे डी.डी. देशमुख विभागीय अध्यक्ष ,अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे मुख्य सल्लागार श्री रामभाऊ येवले कार्याध्यक्ष श्री अतुल वर्मा सहकार्याध्यक्ष श्री किसनजी शेंडे ,सचिव श्री रत्नाकर तिडके कोषाध्यक्ष श्री अरविंद चिखलीकर उपाध्यक्ष श्री रामदास डोकरीमारे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सभेमध्ये 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या सभासदांचे यथोचित सत्कार करण्यात येऊन ,चर्चासत्र घेण्यात आले. सभेमध्ये श्री  बोडखे यांनी सत्काराला उत्तर देताना संघटनेची किमया व योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर संजय मानकर यांनी निरोगी राहण्याचे उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सभेच्या सुरुवातीला शारदा मातेच्या स्तवन व स्वागत गीताने श्रीमती भांगे मॅडम यांनी सुरुवात केली व आभार प्रदर्शन श्री अतुल वर्मा कार्याध्यक्ष यांनी केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन श्री प्रेमलाल लांजेवार यांनी केले. 
कार्यक्रमात सभासदांची बऱ्यापैकी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या