Ticker

6/recent/ticker-posts

एक प्रतिभावंत कवयित्री कु.मंगल मिसाळ!


साहित्य क्षेत्रातील मिसाळ यांची कामगिरी उल्लेखनीय व मोलाचीचं !

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : साहित्य क्षेत्रात ज्या काही नामवंत व प्रख्यात कवयित्री आहेत.त्यात ठाण्याच्या कवयित्री कु.मंगल मिसाळ यांचा क्रमांक लागतो.शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मध्यंतरी थाटात व उत्साहात पार पडलेल्या कविसंमेलनात जाण्याचा योग आला .त्यावेळी मिसाळ ह्या सदरहु कविसंमेलनात उपस्थित नव्हत्या. पण तेथील मित्र मंडळीत चर्चा करताना सहज एक सहज सुचलंच्या कवयित्री म्हणून त्यांचा नावाचा उल्लेख केला तेव्हा काही कवि मित्र म्हणाले त्यांच्या ब-याच कविता वाचण्यात गेल्या. त्यांच्या कवितेचा दर्जा उत्तम व वाखाणण्याजोगा असतोय!
हे शब्द पटकन त्यांच्या मुखातून बाहेर पडले. ख-या अर्थाने ही त्यांच्या यशाची पावती आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही .

ॲड.मेघा धोटे म्हणतात - त्या एक उत्तम कवयित्री!
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंची मार्गदर्शिका म्हणून ॲड मेघा धोटे यांनी ज्या दिवसांपासून जबाबदारी सांभाळली त्या दिवसांपासून त्या कवयित्री मिसाळ यांच्या कवितांचे प्रामुख्याने वाचन करीत असतात.साहित्य क्षेत्रातील मेघा धोटे यांचा  अनुभव दांडगा आहे.
त्यांनी देखील कवयित्री कु.मंगल मिसाळ यांच्या काव्यरचनांना पसंतीची पावती दिली आहे.

साहित्य क्षेत्रातील आपणांस अनुभव नसला तरी एका चर्चा दरम्यान मेघा धोटे यांनी मिसाळ यांच्या काव्यरचना विषयी आपणांस बोलून दाखवल्याचे नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी खूद्द किरण घाटे यांच्या जवळ सांगितले. सहज सुचलं काव्यकुंजवर आज अनेक उत्तम कवयित्री कार्यरत आहेत.त्यांनी नवोदितांना मार्गदर्शन व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आठवडी एकदा काव्यरचनेचा उपक्रम सुरू करावा अशी अपेक्षा मायाताई कोसरे यांनी व्यक्त केली. सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपवर गेल्या काही वर्षांपासून कु.मंगल मिसाळ ह्या कार्यरत असून त्या अधून मधून आपल्या काव्यरचना गृपवर लिहत असतात. एका खासगी संस्थेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करण्याचे कार्य त्या प्रामाणिकपणे करीत आहेत.
याच शाळेत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत.त्यांच्या वर्गातील विद्यार्थीनी आज उत्तम प्रकारच्या कविता लिहु लागल्या आहेत.एवढेच नाही तर त्या शुध्द मराठी भाषेत पत्रलेखन करु लागल्या आहेत.हे सर्व श्रेय कवयित्री मंगल मिसाळ यांचे आहे.गावापासून शाळा दूर जरी असली तरी त्या नियमितपणे ट्रेनने प्रवास करुन शाळेत वेळेवर उपस्थित राहत असतात.

दुःखाला बाजूला सारले;उत्तम
 विद्यार्थी कसे घडेल या कडे लक्ष पुरविले! 
आई वडिलांचे छत्र केव्हाचेच हरपले .ते दुःख त्यांना अद्यापही आहेचं.पण त्या दुःखाला बाजूला सारुन त्यांनी भविष्यात माझ्या हातून विद्यार्थी कसे उत्तम व गुणवंत  ठरतील या कडे सर्वाधिक लक्ष पुरविले आहे. किरण घाटे,मायाताई कोसरे व मेघा धोटे यांच्या विषयी मंगल मिसाळ यांच्या मनात आदर! 

कवयित्री मंगल मिसाळ ह्या अतिशय शांत स्वभावाच्या असून त्या नेहमीच किरण घाटे,मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांचा आदर करीत आलेल्या आहेत.व आज ही त्या तेवढाच त्यांचा आदर करीत असल्याचे दिसून येते.
त्यांना आजही गृप विषयी काही अडचण व समस्या असल्यास त्या थेट किरण घाटे किंवा मेघा धोटे यांना फोन लावून आपल्या समस्या सोडवून घेतात .
त्यांच्यात कुठलाही बडेजावपणा नाही.साधी राहणी उच्च विचार हेच ध्येयधोरणे त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात बाळगले आहे
त्या मेघा धोटे यांच्या आवडत्या आहेत.नेहमीच त्या आठवण आली कि रिकाम्या वेळेत त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधत असतात.
त्या खरोखरचं एक प्रतिभावंत कवयित्री व आदर्श शिक्षिका आहे यात मुळीच शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या