ग्राम सभाचे विषय न घेता घेतला वेगळा विषयाचा गंभीर प्रकार उघडकीस.
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या १३ फेब्रुवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती त्या ग्रामसभेमध्ये उपस्थित ३० ते ३५ लोक आणि १२६ लोकांचे खोट्या स्वाक्षरी घेण्यात आल्या आहे.
सदर ग्रामसभेत जे व्यक्ती उपस्थित नव्हते तरी त्यांचे सुद्धा नावे लिहून स्वाक्षरी केलेली आहे. आणि कोरम पूर्ण करून सभा घेण्यात आल्याचा गंभीर आरोप त्या सभेमध्ये १० विषय घेण्याचे नोटीस सुद्धा करण्यात आले होते परंतु सरपंच व काही राजकीय नेत्यांनी गाहाळ करून चुकीच्या मार्गाने तात्काळ निर्णय घेऊन दुसराच ठराव पारित केल्याची माहिती मिळाली आहे सदर ग्राम पंचायतला कोणतेही अधिकार नसून सुद्धा चुकीच्या प्रकारे ग्रामसभेत ठराव घेतले आहे. ग्रामसभेत हा विशेष नव्हता तरीसुद्धा घेतला कसा हा मोठा प्रश्न? आहे. आणि त्या ग्रामसभेमध्ये याची माहिती त्याच दिवशी तात्काळ सी ओ साहेब जिल्हाधिकारी साहेब बि डिओ साहेब यांना ग्रामसभेचे फोटो व पूर्ण लिस्ट देऊन माहिती देण्यात आली होती. आणि सदर काही एक पत्रकार राजुऱ्याचे ते खोटी बातमी प्रकाशित करून बदनामी करीत आहे त्याचे विरूद्ध तक्रार होईल परंतू संबंधित अधिकाऱ्याने सरपंच व अधिकारी विरुद्ध अविश्वास पारित करण्यात यावे. तरी सी ई ओ साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे ग्रामसभेचे तक्रार देण्यात येणार आहे. अशी गावकऱ्यांनी विनंती केली आहे.


0 टिप्पण्या