Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यातील ताहीरभाई शेख यांच्यासह १४ मान्यवरांना कोल्हापुरात 'शिव प्रेरणा पुरस्कार' जाहीर

चित्रा न्युज प्रतिनिधी 
​कोल्हापूर:पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व परिवर्तन फौंडेशन प्रणीत 'सर्वधर्मीय जयंती महोत्सव समिती'च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ मान्यवरांना यावर्षीचा मानाचा 'शिव प्रेरणा पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ताहीरभाई शेख यांच्यासह प्रशासन, समाजसेवा आणि कला क्षेत्रातील व्यक्तींचा यात समावेश असल्याची माहिती समितीचे कार्यवाहक मच्छिंद्र रूईकर यांनी दिली.
​शाहू स्मारक भवन येथे दिमाखदार सोहळा
​हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता, कोल्हापूर येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन येथे आयोजित 'शिव महोत्सवा'त संपन्न होणार आहे.
​प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
​या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते होणार असून, पँथर आर्मीचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्रसिंग वालिया हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मीचे प्रमुख संतोष आठवले भूषविणार आहेत.
​पुरस्कारार्थींची नामावली
​या सोहळ्यात खालील मान्यवरांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे:
​ताहीरभाई शेख (पुणे): ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
​कृष्णात जाधव (महाराज), रेंदाळ: आध्यात्मिक गुरु
​भगवानराव धेंडे (पुणे): ज्येष्ठ साहित्यिक, गायक व लेखक
​विनोद सोमाजी जाधव (बुलढाणा): सामाजिक कार्य
​संतोषभाऊ दत्तात्रय शेंडगे (पिंपरी चिंचवड): सामाजिक कार्य
​अर्चना कोळी (वसई): सहाय्यक पोलीस निरीक्षक
​सदाशिव लक्ष्मणा घाडीगावकर (विरार): सामाजिक कार्य
​राजेश पाटील: दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, कोल्हापूर
​शांताराम डोईफोडे: दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, कोल्हापूर
​स्तवन पेत्रस सोरटे: क्रीडा शिक्षक, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल
​सांस्कृतिक मेजवानी आणि विशेष सत्कार
​पुरस्कार सोहळ्यासोबतच ज्येष्ठ गायक सुरेश सातारकर यांचा 'क्रांतिकारी गीतांचा' बहारदार कार्यक्रम होणार आहे. तसेच नूतन जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे (कबनूर), महेश पाटील (चंदूर) आणि नूतन पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे यांचाही विशेष जाहीर सत्कार याप्रसंगी करण्यात येईल.
​या सोहळ्यासाठी परिवर्तन फौंडेशनचे संस्थापक अमोल कुरणे, चंद्रकांत मुळे, उमेश जामसंडेकर, प्रा. अरुण मेढे, ज्योतीताई झरेकर, लक्ष्मीकांत कुबळे, बबन तांदळे, सौ. छाया सातारकर नितेश कुमार दिक्षांत जिल्हा महासचिव , संजय कांबळे जिल्हा उपाध्यक्ष , राजू मोमीन हातकणंगले तालुका अध्यक्ष आनंदा तरटे करविर तालुका उपाध्यक्ष, भिकु कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष यांच्यासह जिल्हयातील अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिव महोत्सवास जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या