त्या वाहकाकडून शासन निर्णयाची पायमल्ली
लाखनी बस स्थानकातील घटना
मुकेश मेश्राम चित्रा न्युज
भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील दरवाजाजवळील चार आसने क्रमांक तीन, चार, पाच व सहा कायमस्वरूपी दिव्यांगांसाठी राखीव ठेवली आहेत. दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झालेला हा अध्यादेश राज्यभर लागू करण्यात आला होता. दिव्यांगांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सन्मानजनक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम कोणी मोडल्यास पाच हजारांच दंड आणि दंड न भरल्यास तुरुगांत पाठवून त्या मजुरीतून दंड वसूल करण्याची तरतुद नियमात आहे.
दिव्यांग प्रवासी कोणत्याही बसस्थानकावरून बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित आसनांवर बसण्याचा हक्क असेल. या आसनांवर सामान्य प्रवासी बसले असतील तर त्यांनी ते तत्काळ रिक्त करणे बंधनकारक आहे.
वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना त्यांचे हक्काचे आसन देण्यासाठी सजग राहावे आणि प्रवासादरम्यान
कोणत्याही अडथळ्याशिवाय दिव्यांगांची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा आहे. एसटी बस वाहकावर प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी देखील असेल. एसटी महामंडळाने प्रवाशांमध्ये या निर्णयाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य प्रवाशांनी नियम मोडल्यास त्यांना प्रति आसन पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल. जर दंड भरण्यास नकार दिला तर संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल आणि त्यांना थेट तुरुंगात पाठविले जाईल. तुरुंगातील कामाच्या मजुरीतून दंडाची रक्कम वसूल होईपर्यंत त्याची सुटका केली जाणार नाही. असे शासन निर्णय असताना देखील. दिनांक १३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी २:१०च्या दम्यान लाखणी बसस्थानकावर नागपूर - गोंदिया बसमध्ये १००% टक्के अंध दिव्यांग असलेल्या राजू अशोक चाचेरे मु.पो. रेंगेपार/कोहळी तालुका लाखणी वय २४ वर्षीय याला वाहका कडुन या बस मध्ये राजुला घेण्यास टाळाटाळ केला.तेव्हा तिथे असणारे एका सुज्ञ व्यक्ती मदनजी कमाने यांनी त्या वाहकाला विनंती केली.की तो व्यक्ती १००% टक्के अंध दिव्यांग आहे.त्या बस मध्ये घ्या पण वाहका कडुन त्या दोघांना ही मुजोरी आणि अरेरावीच्या भाषांच्या वापर झाला.
वाहकाकडून दिव्यांगाचा वारंवार अपमानास्पद वागणूक का दिला गेली.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एस टी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करित नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, तथापि, दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असेल. याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ-उतार करताना प्राधान्य दयावे, तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील देण्यात आलेली आहेत. तरी सुद्धा वाहका कडुन अंध अपंग प्रवाशाचा अपमान केला जातो.
त्या वाहकाकडून दिव्यांगाचा वारंवार अपमानास्पद वागणूक का दिला गेली. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९३ अन्वये वाहकावर गुन्हा नोंद करून या प्रकरणाची चौकशी विभागाने करावी.


0 टिप्पण्या