Ticker

6/recent/ticker-posts

मौजा मेसा गावात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा : हेल्पएज इंडीया,GMR वरलक्ष्मी फाउंडेशन यांच्या वतीने व वेधा संस्था शेगांव (बु.)आणि मेसा ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून दिनांक 21 फेब्रुवारी 2026 शनिवारला सकाळीं. 9.30 वाजता मेसा या गावात 50 वर्ष वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला.
या शिबिरात ताप ,सर्दी , खोकला, खाज सुटणे, बीपी , शुगर तसेच अस्थमा या आजाराची तपासणी करुन औषध मोफत देण्यात आले. मेसा गावातील 94 वयोवृद्ध महीला पुरूषांनी  ज्येष्ठ नागरिकांनी शीबिराचा  लाभ घेतला  दिनांक.. 21 फेब्रुवारी 2026 रोज शनिवारला मेसा
जि.प.शाळेतील पंटागनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाकरीता हेल्पेज इंडियाची टीम सामाजिक संरक्षण अधिकारी राशेदा शेख डॉक्टर विनय कुंभारे फार्मासिस्ट वैभव देठे ड्राइवर संदीप काळे वेधा
संस्था कार्यक्रम समन्वयक विलासरावजी माटे. यानी सहकार्य केले. गावातील.सरपंच तथा गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष निलकंठरावजी वरभे. व तसेच  शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते. होमराज घुमे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
असा कार्यक्रम किमान दोन महीन्यातुन एकदा व्हावा अशी  गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या