Ticker

6/recent/ticker-posts

चंदनखेडा येथे पार पडले मार्गदर्शन शिबीर!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : चंदनखेडा येथील पिएमश्री जि.प.उच्च प्राथ.शाळेत "बाल लैंगिक गुन्हा संरक्षण कायदा २०१२ ( पोक्सो ) अंतर्गत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते .      
        या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून अँड.सुविर भालेराव, अँड.सुषमा वडाळकर व अँड. स्नेहा खडके उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ घेता आला.    
       कार्यक्रमाची सुरुवात आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाहुण्याच्या हस्ते डॉ.सी .व्ही.रमण यांच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मुख्याध्यापिका अनिता आईंचवार यांनी केले तर अध्यक्षीय भाषण शा.व्य.समितीचे अध्यक्ष अनिल कोकुडे यांनी केले.
सदरहु कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगला दडमल  यांनी केले.या मार्गदर्शन सत्राचा लाभ सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंदांनी घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या