चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे मूल नगरीचे इंदिरा काँग्रेसचे जेष्ठ नेते दत्तात्रय समर्थ यांची आज शनिवार दि.२८ फेब्रूवारीला भारतीय राष्ट्रीय मजदूर काॅंग्रेस (महासंघ) इंटकच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती ॲड.सुभाष सावन माछरे यांनी केली आहे.
नुकतेच त्यांना हे नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.
सदरहु नियुक्ती ही तीन वर्षांपर्यंत असल्याचे उपरोक्त नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.
समर्थ यांच्या नियुक्तीचे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.


0 टिप्पण्या