Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भिमशाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना " नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार -2026 लातूर येते सन्मानित.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोशियन ( महाराष्ट्र राज्य) च्या वतीने आयोजित गौरव कर्तव्याचा...! सत्कार समाजसेवकांचा...! मातृभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे! या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना " नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार -2026 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक मध्यवर्ती मध्यवर्ती बस स्थानकाचा मागे  मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रम उद्घाटन सोहळ्याचा अध्यक्षा सिनेमा अभिनेत्री सुनंदा तु गावकर होत्या, सदर कार्यक्रमाचे उद्घाटक सुनील गायकवाड यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती समाजसेविका मीनाक्षी पाखरे, युवा भिम सेना संस्थापक अध्यक्ष पंकज काटे, अभिजीत शिंदे, रामचंद्र तांदळे, अनिस खान पठाण, सिद्धार्थ भैया कवठेकर, शितल बलदोटा, साहित्यिक गझलकार मधु बावल कर, मी ज्ञानज्योती सावित्री बोलते गायत्री रामटेके, सुप्रसिद्ध गायक तथा पत्रकार सदानंद मोरे, भीम शाहीर प्रबोधनकार प्रदीप कडबे रामटेक, सुप्रसिद्ध गायक समाधान लोणकर, डॉक्टर, पत्रकार श्याम जाधव, पत्रकार सुधाकर रणदिवे, सामाजिक कार्यकर्त्या उषा धावरे, सामाजिक कार्यकर्ते बी आर ढगे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुफी सय्यद समशुद्दीन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांचा हस्ते महापुरुषांचा प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रचलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रबोधनकार भीम शाहीर सुप्रसिद्ध गायक तथा पत्रकार प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनातून भक्तीमय गीतांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गीत- सांगा मी काय करू, भक्ती करू का पोटभरू, सांगा मी काय करू, कारण - भक्ती वीणा देव दिसत नाही, पैशाविना संसार चालत नाही, कोणता मी मार्ग धरून, सांगा मी काय करू, आपल्या गायनातून रसिकाचे मने मंत्रमुग्ध केले. सामाजिक, पत्रकारितेतील, समाज प्रबोधनाचा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भीम शाहीर प्रदीप कडबे यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ शाल मानाचा फेटा देऊन नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला साहित्यिक गझलकार मधुबावल कर, भीम शाहीर सदानंद मोरे अकोला, बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते विभीषण आर, ढगे,सामाजिक कार्यकर्त्या कविता ढगे, मी रमाई बोलते शिपा पवार, सोनाली पाटमासे, भीम शाहीर समाधान लोणकर हिंगोली, उत्कृष्ट कलावंत गायत्री रामटेके, डॉक्टर श्याम जाधव पत्रकार, पत्रकार सुधाकर रणदिवे, मनीष मुथा पत्रकार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संयोजक सुफी सय्यद सामशुद्दीन यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज मादळे, महादेव कपाट यांनी केले, समाजसेवक सुफी सय्यद समशुद्दीन यांनी उपस्थित पाहुण्यांचे  आभार मानून सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कलावंत, समाजसेवक,उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या