Ticker

6/recent/ticker-posts

पोकाॅ.शिवाजी केंद्रे यांनी पाऊस व वादळीवा-यात ३ लाखांचा गुटखा,५ लाखांचा टेंम्पोसह १ आरोपी पकडला...!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:-दि.३० मार्च रोजी राञी आवकाळी पाऊस आणी सोसाट्याच्या वादळी वा-यामध्ये वाढवणा पो.स्टे. चे पोकाॅ.शिवाजी आर.केंद्रे यांनी मिळालेल्या माहिती वरुन अहमदपुरकडे बोलेरो कंपनीचा MH 14 DT 9139 या नंबरचा टेंम्पो संशायस्पदरितीने येत असल्याचे लक्षात येताच सदर टेंम्पो थांबवून त्याची झडती घेतली असता त्यात बंदी असलेला विमल नावाचा ३ लाख १२ हजार रुपये किंमतीचा गुटखा.
सोबत ५ लाखांचा टेंम्पो असा मुद्येमाल आणि टेंम्पो चालकाला अवकाळी पाऊस,राञीचा काळोख आणि वादळी वा-यामध्ये ताब्यात घेतला आहे.
पोलिस सुञांनी दिलेली माहिती अशी की,वाढवणा ठाण्यातील पोकाॅ.शिवाजी केंद्रे हे वाढवणा पाटीवर दि.३० रोजी राञी ९ वा. दरम्यान कर्तव्य बजावत असताना त्यास मिळालेल्या माहितीचा टेंम्पो उदगीरहून संशायस्पदरित्या येत आहे. असे लक्षात येताच.त्याला थांबवून झडती घेतली तेंव्हा  टेंम्पो अहमदपुरकडे गुटखा घेऊन जात असल्याचे सदर टेंम्पोत ३,१२०० रुपयांचा विमल गुटखा,सुगंधी जर्दा मिळून आला.म्हणुन चालक रसुल इब्राहिम शेख,वय ४१ रा.भाग्यनगर अहमदपुर व मुख्य विक्रेता(मालक) राजु हामणे,अहमदपुर यांच्या विरुध्द पोकाॅ.शिवाजी केंद्रे यांनी फिर्याद दिल्यावरुन आरोपीविरुध्द गुरनं८१/२६
कलम-१२३,६२,२२३,२७४
 २७५,३(५)बीएनएस सह कलम ५९ अन्न व औषधी सुरक्षा मानदे अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास सपोनि.गायकवाड करत आहेत.मुख्य आरोपी लवकरच ताब्यात येईल.
असा विश्वास सपोनि.एस. पी.गायकवाड व पो.काॅ. शिवाजी केंद्रे यांनी व्यक्त केला.
गत ८ दिवसात गुटख्यावर झालेली ही २ री सर्वात मोठी रेड असल्याने गुटखा विक्रेत्यांमध्ये विशेष करुन टपरीधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
माञ,सुकणी,हंडरगुळी ता. उदगीर व हटकरवाडी तंडा ता.चाकुर येथील तस्कर मंडळी मोकाटच असल्याने ते गुटख्याची होमडिलिवरी देतात.तेंव्हा हटकरवाडी व सुकणी,हंडरगुळी येथील गुटखा तस्करांवर पोलिस अटॅक करणार कधी?अशी चर्चा जनतेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या