Ticker

6/recent/ticker-posts

चांगल्या निर्णयाचे स्वागत ! पण. प्रासंगिक :- रवि भोंगाने

चांगल्या निर्णयाचे स्वागत ! पण. 
 प्रासंगिक :- रवि भोंगाने 
कोरोना नंतरच्या काळापासून बायपास ( सर्व्हिस ) रस्त्यावर भरणारा गुजरी बाजार अखेर नगरपरिषद प्रशासनाला हटविण्यात यश मिळाले. नगरपरिषद प्रशासन, साकोली पोलीस विभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हूसन यांच्या मार्गदर्शनात हा प्रश्न निकाली निघाला. वयोवृद्ध, विद्यार्थी, वाहन चालक यांना रस्त्यावरील गुजरीमुळे कमालीचा त्रास होऊ लागलेला होता. वाहन चालकांना व्यापारी दुकानातून एखादी वस्तू घ्यावयाची असेल तर आपली वाहने कुठे ठेवायची ही समस्या निर्माण झालेली होती. काही वर्षापर्यंत नगरपरिषदमध्ये प्रशासक राज असल्याने हा प्रश्न निकालात निघत नव्हता. अखेर ३ वर्षानंतर लोकप्रतिनिधीचे लोकराज्य नगर परिषदेमध्ये आले आणि नागरिकांनी एका एका समस्येचा पाढा आपल्या नगराध्यक्षांसह आपल्या प्रभागातील नगरसेवकांना वाचायला लावला. विशेष म्हणजे प्रसिद्धी माध्यमांनी हा विषय ऐरणीवर घेऊन नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले. नगरपरिषद मूठभर भाजीपाला विक्रेता लोकांची की समस्त नागरिकांची असा विषय लावून धरून रस्त्यावरील गुजरीचा विषय नगर परिषदेच्या लोक दरबारात समोर आणला. जुन्या आठवडी बाजारात जागा असंतांना मुठभर भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकानदारी रस्त्यावर लावली. तेव्हापासून अट्टाहासपणा, हुकूमशाहीपणा, हेखेखोरपणा आणि मेरी मर्जी अशा उद्दामपणाने काही भाजी विक्रेते वागायला लागले होते. बायपास रस्त्यावर उलट वाहन चालकालाच ही वाहन ठेवायची जागा आहे का असे उलट उत्तरे मिळायची. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचा अहंपणा हा कुणामुळे वाढीस लागला हे समजायला मार्ग नव्हता. परंतु राजकीय प्रतिनिधींची राजसत्ता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अधिकार यांची सांगड घातली तर काय होऊ शकते याचे प्रत्यंतर साकोलीच्या नागरिकांना दिसून आले. परंतु हा प्रश्न आता कायमसाठी निकालात निघावा. पुन्हा भाजी विक्रेत्यांची गुजरी रस्त्यावर येणार नाही याची काळजी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांना घ्यावी लागेल. साकोलीच्या नागरिकांना शिस्तीची सवय नाही. त्यामुळे शासकीय दंडुक्यातून हा बेशिस्तपणा दूर करावा लागेल. पुन्हा एकदा नगरपरिषद प्रशासन, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हुसेन आणि साकोली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर आणि यांच्या चमूचे पुन्हा एकदा अभिनंदन!
______________________________________________

                    हो.. आम्ही बेशिस्त आहोत ?

वाहन चालक आणि पादचाऱ्यांना बायपास रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचा त्रास होत होता. प्रशासकीय पातळीवर सध्या तरी हा प्रश्न निकाली निघाला. परंतु प्रशासना बरोबरच तेवढीच जबाबदारी आता नागरिकांची आहे. आपली दुचाकी चारचाकी वाहने उभी करतांना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण स्वतः बेशिस्त वागायचे आणि दुसऱ्याला शिस्त शिकवायची याला काहीच अर्थ नाही. शिस्त अंगवळणी पडायला वेळ लागेल. परंतु शिस्तीची सवय स्वतःपासून लावावी लागेल. संस्कारातून शिस्त घडते मात्र संस्कार नसले की मग शासकीय दंडुक्यातून शिस्त लावावी लागते. त्यामुळे शिस्त लावून घ्यायची की शिस्त दंडुक्यातून लावावी लागेल याचा संस्कारमय विचार आता नागरिकांनाच करावा लागणार आहे. कारण गुजरी हटविलेल्या जागेवर ज्याने बेशिस्तपणाने आपले वाहन उभे केले असेल त्याला पोलीस विभागाने चालान करावे. निदान इथून तरी शिस्तीची सवय लागेल. कारण आम्ही बेशिस्त आहोत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या