Ticker

6/recent/ticker-posts

कानडा ( पार्डी ) येथे जागतीक महिला दिन साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : महिलांना सन्मान व समान संधी मिळाव्यात या उद्देशाने  गट ग्रामपंचायत कानडा (पार्डी ) मध्ये भव्य झजागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
समाजात महिलांना योग्य संधी, सन्मान व समान वागणूक मिळावी तसेच विविध क्षेत्रांमध्ये महिलांबद्दल असलेले गैरसमज आणि दुय्यम वागणूक दूर व्हावी, या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व गावाच्या माध्यमातून करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कानडा (पार्डी ) यांच्या सरपंच सौ. सुषमा रूपेश ढोके होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स तसेच गावातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
या प्रसंगी गावातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या अनेक महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्याख्याता ह.भ.प. सौ. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येण्याची गरज अधोरेखित केली.
तसेच ग्रामपंचायत महिला सदस्या रेखा आस्कर, कविता झीले आणि कलावती बोथले यांचीही उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा आस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी प्रभाकर फूलभोगे यांनी मानले.
या उपक्रमामुळे गावातील महिलांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासोबतच महिलांच्या सन्मानाबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला या कर्यक्रमाला संपूर्ण ग्रामवासियांनी मौलाचे योगदान दिले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या