चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : जागतिक महिला दिना निमित्ताने नाभिक समाज महिलां संघटना तर्फे श्री. संत नगाजी महाराज मंदिर येथे कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन मायाताई, चिंचोलकर, तर मार्गदर्शक स्मिताताई नागपूरकर या होत्या. यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये SBI बँकेत निवड झाल्याबद्दल कु. अवनती बंडुजी लांडगे हिचा नाभिक महिला समाज संघटना तर्फे सत्कार करण्यात आला. तसेच "स्त्री यांच्या जीवनात असणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्व या विषयावर प्रत्येक महिलांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोना जांभूळकर तर आभार शालिनी शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रागिणी सूत्रपवार, मनीषा दयालपवर, वैशाली दळवी, माधुरी देवईकर, छाया जमदाडे, सविता लांडगे, गौरी नक्षीने, मनीषा कडुकरं, पूर्वी नागपूरकर, दामिनी लांडगे वर्षा वाटेकर,नंदिनी लांडगे, शोभा लांडगे, सुप्रिया निंबाळकर, अनिता निंबाळकर, विमल लांडगे, श्रुती लांडगे,सुवर्णा देवईकर.यांनी सहकार्य केले यात असंख्य महिला उपस्थित होत्या.


0 टिप्पण्या