चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा या चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक हाजी ईजाज अशरफ यांचे काल सकाळी अकरा वाजता नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. निधनाची दुःखद वार्ता कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ही बातमी भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कळताच महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव उमाटे होते. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ सुधीर आस्टुनकर यांनीही आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ उमाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मूक श्रद्धांजली सभेनंतर महाविद्यालयास सुटी देण्यात आली.
विवेकानंद ज्ञानपीठ (काॅन्व्हेट), वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी अशरफ यांच्याविषयी बोलताना सांगितले की, " अशरफ साहेबांच्या निधनाने संस्थेचे, शाळा-महाविद्यालयाचे अपरिमित नुकसान झाले आहे. एक संवेदनशील, कर्तृत्ववान व्यक्तीत्व आपण गमावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अशरफ साहेबांच्या कार्याची व व्यक्तिमत्त्वाची आठवण सदैव राहील असे त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले.


0 टिप्पण्या