Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावतीत अवैध ८ ब्रास रेतीसह हायवा व १० ब्रास रेतीट्रक जप्त..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : तालुक्यात अवैध रेती वाहतुकी विरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत डॉली पेट्रोल पंप परिसरात तसेच गुलमोहर पार्क, चिचोर्डी येथे दोन मोठी वाहने  पकडुन केलेल्या. या मोठ्या  कारवाईमुळे रेती माफियांचे ठोके... वाढले  आहे.

 महसूल विभागाकडुन  मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे तहसील मंडळ अधिकारी समीर वाटेकर यांनी आपल्या पथकासह सापळा रचून चंद्रपूर वरून अवैद्य रेती घेऊन येत असलेल्या संशयित हायवा व ट्रक माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे ५ वाजता MH-34 CQ 6099 क्रमांकाचा हायवा ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली असता त्यात अवैध रेती खाली करत असताना आढळून आली.
     
   दरम्यान, गुलमोहर पार्क, चिचोर्डी येथे हायवामधील सुमारे ८ ब्रास रेती खाली करण्यात येत असतानाच महसूल व गौण खनिज पथक अचानक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने संबंधितांकडे रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता तो उपलब्ध नसल्याचे आढळून आले. हायवा मालकाचे नाव मीतीलेश चन्ने राहणार चंद्रपूर असल्याचे सांगितले जाते संबंधित वाहन व व्यक्तींना ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
    याच दिवशी डॉली पेट्रोल पंपाजवळ आणखी एक  मोठा ट्रक रेतीने भरलेला सापळा रचून जप्त करण्यात आला. संबंधित ट्रक नागपूर (उमरेड ) येथील मालक वहील शेख, यांचे मालकीचे असल्याची माहिती पुढे आली आहे.
    सदर कारवाई  तहसिल मंडळ अधिकारी  समीर वाटेकर ग्राम महसुल अधिकारी तलहार , तळवेकर,व त्यांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पार पाडली.
 ८ ब्रास रेती थेट खाली करताना पकडला, मोठ्या रॅकेटची शक्यता परवाना नसताना खुलेआम रेती उतरणे सुरू, महसूल विभागाची कारवाई ...!
भद्रावतीत अवैध रेती वाहतूक थांबणार का? की माफियांचे जाळे अजून खोलवर आहे? प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या