Ticker

6/recent/ticker-posts

विशेष कार्यकारी अधिकारी पदावर व्होळे (खुप)येथील कुंदन वजाळे यांची नियुक्ती

चित्रा न्युज प्रतिनिधी.
सोलापूर :-जिल्ह्यातील प्रशासनिक यंत्रणेला सक्षम व गतिमान करण्यासाठी दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. असून सोलापूर जिल्हधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा तालुक्यातील व्होळे (खु) येथील कुंदन चांगदेव वजाळे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिफारसी अनुसार निवड करण्यात आली आहे . या नियतीने प्रशासनातील समन्वय आणि कार्य. क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची व्यक्त केली जात आहे. विशेषता प्रलबित कामे मार्गी लावणे जनतेच्या समस्या तातडीने सोडवणे आणि योजनेची प्रभावपणे अंमलबजावणी यावर अधिक भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहे.  त्यांच्या निवडीने विविध स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.नवीन विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिनांक १६ मार्च २०६काढले आहेत. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील यांच्या सहकार्यामुळे निवड करण्यात आली आहे. त्यांना मार्च २०३१ पर्यंत पदावर राहण्याचा अधिकार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या