Ticker

6/recent/ticker-posts

पोळ्या बनविणे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास


जि. प. शाळा बाम्हणीचा भन्नाट उपक्रम 



चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-शाळेत मुलांनी स्वतः पोळ्या तयार केल्या तर त्याचे परिणाम केवळ जेवणापुरते मर्यादित न राहता ते मुलांच्या सर्वांगीण विकासावर होतील या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी येथील मुख्याध्यापक राम चाचेरे यांनी मनात भन्नाट कल्पना शोधत वर्ग पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाच पोळ्या लाटण्याची प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी घरून सर्व साहित्य आणले. चक्क चुली तयार करून त्यावर विस्तव पेटवून  तव्यावर त्यांनी पोळ्या शेकल्या. एवढेच नव्हे तर,पीठ मळण्यापासून ते पोळी तयार करणे, पोळी भाजणे, या सर्व क्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षकांच्या देखरेखिखाली पार केल्यात. यामुळे मुलांमध्ये बऱ्याच प्रकारचे बदल जाणवले. यामुळे मुलांमध्ये जीवनकौशल्यांचा विकास झाला.(Life Skills)
मुलांना स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याचा अनुभव मिळाला.. स्वावलंबन (Self-reliance) वाढल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला की आपण स्वतःची गरज भागवू शकतो.गणित आणि विज्ञानाचा सराव झाला पोळ्या बनवणे ही एक प्रक्रिया आहे ज्यात मोजमाप आणि शास्त्र दडलेले असते.
गणित शिकले. पीठ आणि पाण्याचे प्रमाण मोजणे, गोलाकार आकार समजून घेणे याचा मुलांनी अभ्यास केला. विज्ञान अभ्यासला पीठात पाणी घातल्यावर होणारा बदल, उष्णतेमुळे पोळी फुगणे. (वाफेचा दाब) यांसारख्या गोष्टी मुलांनी प्रत्यक्ष अनुभवल्यात. श्रमाची प्रतिष्ठा (Dignity of Labour) अनुभवली मुलांनी स्वतः कष्ट करून पोळी बनवली , तेव्हा त्यांना अन्नाचे महत्त्व समजले . स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीबद्दल (आई किंवा आचारी) त्यांच्या मनात आदर निर्माण झाला आणि यामुळे अन्नाची नासाडी करण्याचे प्रमाण कमी होईल हे मात्र निश्चित.एकाग्रता आणि समन्वय निर्माण झाला. पीठ मळणे, त्याचे गोळे करणे आणि पोळी लाटणे यासारख्या क्रिया मुलांनी करण्यासाठी हात आणि डोळे यांचा ताळमेळ (Hand-eye coordination) आवश्यक असतो. यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत झाली. मुले लहान असल्यामुळे शिक्षकांनी स्वतः उपस्थित राहून सदर कृतीवर नियंत्रण ठेवले कारण सुरक्षितता ही महत्त्वाची बाब या उपक्रमाला आवश्यक होती.गॅस किंवा विस्तव वापरताना भाजण्याची भीती असते, त्यामुळे शिक्षकांनी बारकाईने लक्ष देऊन कामे नियंत्रित केली. स्वच्छता सुद्धा शिकले.मुलांनी हात धुणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या शिस्तीचे पालन केले.
एक चांगला उपक्रम म्हणून सदर उपक्रमाचे कौतुक केले जात आहेत. "आनंदी शनिवार" आणि "कार्यानुभव" (Work Experience) या तासाला हा उपक्रम राबवला, त्यामुळे मुले आनंदाने आणि गटात मिळून काम करायला शिकलेत.. शेवटी सर्वांनी मिळून त्यांनी बनवलेल्या पोळ्यांचा आस्वाद घेतला . श्रमाचे फळ गोड असते, हा अनुभव त्यांना आला .
 सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे की एवढ्या लहान वयात सुद्धा विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी येथे होत असलेले बघून सर्व पालक वर्ग आनंदीत झालेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या