चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा:-जागतिक महिला दिनानिमित्त गोंडवाना महिला बचत गट मेळावा आर्वी.ता.आर्वी .जि.वर्धा.दिनांक 10 मार्च 2026 ला आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी वर्धा आ. सौ. गीतांजली निकम मॅडम व सौ. सोणोने मॅडम आणि महाराष्ट्र शासन आदिवासी पुरस्कृत माननीय तिरु. अजाबराव उईके अकोला. तसेच तिरूमाय. यशोदाताई व्यंकटेश आत्राम
या कार्यक्रमाला 15 महिला बचत गट उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही आदरणीय सौ. निकम मॅडम यांना राणी हिराई यांचा प्रतिमा फोटो भेट वस्तू म्हणून दिला व या निमित्ताने ज्या मात्रुशक्तीचे कोयापुनेम कार्य उत्कृष्ट आहे अशा 15 मात्रृशक्तीचे या ठिकाणी सत्कार करण्यात आले.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी वर्धा आ.सौ. निकम मॅडम यांनी मातृशक्तींना ज्या काही आदिवासींच्या सवलती आहे योजना आहे ज्या योजनाचा आदिवासी समाजाला लाभ मिळतो त्या त्यांनी समजावून सांगितलेले आहे आणि कुठलीही अडचण आली तर तुम्ही थेट वर्धा जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये येऊ शकता आणि माझ्याशी बोलू शकता चर्चा करू शकता मी जर ऑफिसमध्ये नसेल तर माझे जे सहकारी आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करू शकता असे त्यांनी मात्रुशक्तीला सांगितलेले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक तिरू. कल्पना खंडाते व तिरू .शारदा सिद्धाम जय गोंडवाना महिला बचत गट आर्वी ह्या होत्या तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरू रंजना नरेश उईके यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिरु. संगीता धुर्वे यांनी केले तर आभार प्रदर्शन तिरू शारदा सिद्धाम यांनी केले या कार्यक्रमांमध्ये 15गावे सहभागी झाले होते.


0 टिप्पण्या