नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते यांनी केले वृक्षारोपण
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटना सदस्य असलेल्या बेरोजगार युवकाच्या रोजगार दुकानाचा उदघाटन सोहळा आज ( रविवार २९ मार्च ) ला तलाव बायपास रोडवर नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते यांचे हस्ते पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने नगराध्यक्ष यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्या गोरगरीब बावणे कुटुंबियांच्या चेह-यावर आनंददिसून आला. मुख्य शहर गणेश वार्ड निवासी गोरगरीब बावणे कुटुंबातील विजय बावणे व संजय बावणे यांनी आपल्या घराच्या समोरच आपल्या मुळ सुतारकाम व्यवसायासाठी जागा स्वच्छ करून दुकान थाटले. कारण शहरात बाहेरच्या लोकांनी येथे येऊन अतोनात अतिक्रमणे करून ४०% टक्के शासकीय जागेची स्टँम्प पेपरवर नोटरी करून ती बेकायदेशीर विक्री करीत पळून गेले आहेत. मग स्थानिक मुळ निवासींना पहिला हक्क का नाही. या प्रकरणी स्थानिक बेरोजगाराला नोटीस बजावल्याने येथील प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी यांनी चांगलेच सडेतोड उत्तर दिले होते. अखेर यात बावणे कुटूंबियांचा विजय झाला आहे. या बावणे परीवाराच्या "भगवान विश्वकर्मा फर्निचर वर्क" प्रतिष्ठानच्या उदघाटन प्रसंगी नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते, उद्योजक निलेश सिंगोर, बावणे परीवाराच्या मातोश्री सखुबाई बावणे, शालू विजय बावणे, वैशाली संजय बावणे, बहिण प्रमिला कोसरे, साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेचे सल्लागार पत्रकार रवि भोंगाणे, प्रसिद्धी प्रमुख आशिष चेडगे, सहसचिव किशोर बावणे, सदस्य कार्तिक लांजेवार, तुकाराम बोरकर आदी उपस्थित होते. साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेच्या मुळ निवासींचा पहिल्या रोजगार दूकानाचे उदघाटन संपन्न झाले. हा शहरातील स्थानिक निवासींचा पहिला विजय आहे यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मेश्राम, उपाध्यक्ष नगरसेवक इंजि. सपन कापगते व अनिल कापगते, सचिव प्रदीप मासुरकर, मार्गदर्शक प्रा. हरिश्चंद्र सोनवाने, अनिल मुरकुटे, महेश पोगळे, सल्लागार पत्रकार डी. जी. रंगारी, कोषाध्यक्ष गणेश बोरकर, निमंत्रक सदस्यगण ॲड मनिष कापगते, मनिषा काशिवार, चंदूभाऊ कापगते, सचिन सुर्यवंशी, मयूर गजापूरे, दिगंबर सुर्यवंशी, विशाल साखरवाडे, मोहन फुलबांधे, आशिष भिवगडे, दामोधर सुर्यवंशी, मुकेश पंचभाई, अजय गजभिये, अमोल हत्तीमारे, लिलाधर मुरकुटे, आदित्य चेडगे, रितीक तिडके व सर्व सदस्यांनी या निर्णयाबद्दल गोरगरीब बावणे कुटूंबियांना पुढील यशस्वी रोजगारासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


0 टिप्पण्या