चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.२७ फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येरोळ ता.शिरूर अनंतपाळ जि. लातूर येथे प्रा.आ.केंद्र येरोळ व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ३५ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती तुळसाबाई लोंढे, उपसरपंच श्री.सतीश शिंदाळकर व येरोळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम सागडे, डॉ.गोविंद जाधव, डॉ.मनिषा गटकुळ, प्रा.आ.केंद्र येरोळ येथील कर्मचारी वर्ग, संजीवनी ब्लड बँक चे पदाधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या