Ticker

6/recent/ticker-posts

सेवावस्ती टाकळी, येथे रोगनिदान व मोफत औषधी वितरण शिबीर संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-समाज जागृती प्रतीष्ठान व डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर, यांच्या संयुक्त प्रयत्नाने, सेवावस्ती टाकळी येथे आयएमए हॉलच्या मागे, दि.२२.३.२०२६ रोजी, जनआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात डॉ.श्री. संजय कृष्णराव मानकर यांनी रुग्णाची आरोग्य तपासणी केली. रोगाचे योग्य निदान करून, रुग्णांना औषधी वितरीत करतांना रुग्णाचे समुपदेशन करण्यात आले.

डॉ. संजय मानकर सरांनी, उन्हाळ्यातील आजार, गोवर, कांजण्या, स्थूलपणा प्रतिबंधात्मक उपाययोजना, दातांचे आरोग्य व मौखिक आजार, पी.सी.ओ.डी. आजार, क्षयरोग सव्र्व्हेक्षण मोहीम, महिला दिवस, महिला किशोरी व युवतीमधील विवीध आजार, कर्णबधिरता, काचबिंदू, किडनीचे आजार, तंबाखू व धुम्रपानामुळे होणारे आजार, झोपेचे महत्व, जागतिक निद्रा दिवस, डोकेदुखी पासून सुरक्षितता, जलदिवस, हवामान बदल व आरोग्य, विविधप्रकारचे मानसिक आजार, इ. बद्दल डॉ. नी विस्तृत व अभ्यासपूर्ण माहिती दिली.

सेवावस्ती समितीच्या वतीने, सर्वांचे आभार मानले. शिबिराच्या यशस्वीते करिता सर्वश्री रविभाऊ नेरकर, स्वप्नील येवले, सागर उजवणे, शशिकांत हजारे सर, इत्यादींनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या