पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील मूरमाडी(तूप.) परिसरातील प्रकार
महसूल व पोलिसांच्या अभयातून वाढले तस्करांचे मनोबल,रेतीघाट बंद तरीही रेती तस्करीला सुगीचे दिवस
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-पालांदूर परिसरासह लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव रेती घाट वगळता ईतर सर्व घाट बंद असतानाही बंदीच्या काळात रेती तस्करीला सुगीचे दिवस आले असल्याचे वास्तव दिसून येत आहे.पोलीस व महसूलच्या अभयातून रेती तस्करांचे धाडस वाढल्याने आता भर दिवसाही लाखनीसह पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतून मुरमाडी(तूप.) परिसराच्या ग्रामीण भागातून शहरी भागाकडे रेतीचे टिप्पर विना रॉयल्टी विना पास सर्रास धावत आहेत.
कारवाईसाठी महसूलकडून कानाडोळा केल्या जात असल्याने दुसरीकडे मात्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. काही महिन्यापूर्वी रेती घाटांच्या लिलावानंतर दरम्यानच्या काळात लिलावीत रेती घाटांवरून रेती सुरु झाली. सामान्यांना अल्प दारात रेती देण्याचा आदेश
धडकताच घाट मालकांनी नवीन युक्तीचा वापर करीत घाटातील चांगली रेती अधिकतम पैसे देणाऱ्याच्या पदरी पाडली तर जाड रोडाचा माल रॉयल्टीच्या माध्यमातून रेती घेणाऱ्या सर्वसामान्यांच्या मस्तकी मारला.
दुसरीकडे याच मऱ्हेगावातून रेती तस्करी करणाऱ्या तस्करांनी
विनालीलावित लाखांदूर तालुक्यातील तावशी,साखरा, दिघोरी ह्या घाटातील सिमांकनातून अहोरात्र बेसुमार उपसा करणे सूरू केले आहे.लाखनी तालुक्यातील लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेल्या मऱ्हेगाव घाटाचे सिमांकन वगळता भूगाव, विहीरगाव,पळसगाव,नरव्हा, लोहारा,ढिवरखेडा इतर घाटांचाही अनधिकृत श्रीगणेशा याच तस्करांनी केला.काही महिन्यांपूर्वी परिसरातील घाट बंद झाले.मात्र या बंदीच्या काळातही महसूल व पोलिसांच्या आशीर्वादाने मुजोर झालेले रेती तस्कर आवरेनासे झाले आहेत.याकरिता तहसील प्रशासनाने नवीन पथक नेमुन मुख्य चौकात व आडवाटेच्या ठिकाणी कारवायांमध्ये वाढ करावी व प्रशासनाचा
महसुल वाचवावा अशी मागणी परिसरातील पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे केली आहे.
महसूल,पोलिसांसह आरटीओचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
अलीकडे पालांदूर व लाखनी पोलीस ठाणे हद्दीतून अवैद्य रेती तस्करीच्या जड वाहनाचा शिरकाव झाला आहे.या जड वाहनामुळे ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये वाहतूक खोळंबल्याचे चित्र उमटून येत आहे.तर दुसरीकडे सध्याघडीला रेती घाट बंद असताना रेतीने भरलेले जड टिप्पर सर्रास ग्रामीण भागासह लाखनी शहरातून सर्रासपणे धावत आहेत.या प्रकारांवर कारवाई करण्याचे अधिकार महसुल, पोलीस व आरटीओचे असताना सर्व विभागाने संयुक्तिक मौन बाळगल्याने एकूणच तिन्हीही विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
रेती तस्करी करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर महसुलच्या दंडाची कारवाई करावी
अधूनमधून या अवैद्य रेती तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाया होत असल्या तरी ही तस्करीतून जप्त करण्यात आलेली वाहने संबंधीत तस्करांकडून न्यायालयातून सूपूर्तनाम्यावर लगेच सोडविली जातात.कायद्यात कोणताही एकच दंड आकारण्याची तरतुद असल्याने महसूल विभागाकडून आकारण्यात येत असलेला दंड यांच्यावर केला जात नसल्याने यांचे मनोबल व धैर्य अधिक वाढले असल्याने हे तस्कर अजून नवीन जोमाने रेती तस्करीच्या कामाला लागून सर्रास अहोरात्र अवैद्य रेती उत्खनन व वाहतूक करतात. याच कारणामुळे प्रशासनाने अवैद्य रेती तस्करी करणाऱ्या वाहनांच्या मालकांवर जबाबदारी निश्चिती करून रेती तस्करी करणाऱ्या सर्वच वाहनांवर महसूली दंडाची म्हणजेच प्रति ब्रास १ लाख २० हजार रुपये दंड अशी कारवाई प्रस्तावित करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


0 टिप्पण्या