Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. सुनंदा गिरीश पाटील शब्दवेल नारीशक्ती साहित्य पुरस्काराने सन्मानीत !


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : गडचिरोली येथील  ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार प्रा. सुनंदा गिरीश पाटील यांना शब्दवेल नारीशक्ती पुरस्कार २०२६ या पुरस्काराने दि. ५ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथे सन्मानीत करण्यात आले . हा पुरस्कार त्यांना त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी प्राप्त झालेला आहे . 
शाल - पुष्प - सन्मानपत्र - सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .

गेली ५४/५५  वर्षांपासून त्या लेखन कार्य करीत आहेत. आजवर त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक पुस्तके प्रकाशनाधीन आहेत . यात काव्यसंग्रह / २ कथासंग्रह / २ कादंबऱ्या / ३ गझलसंग्रह प्रकाशित आहेत . त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत .
अनेक प्रातिनिधिक संग्रह / कार्यालयीन गृहपत्रिका / वृत्तपत्रे / मासिके यातही त्यांचे बरेच साहित्य प्रकाशित झाले आहे. तरुण भारत / लोकमत / लोकसत्ता / नवराष्ट्र / पुण्यनगरी / देशोन्नती / मराठवाडा / जनमंगल अशा विविध ठिकाणी त्यांनी सदर लेखन केले आहे. आजही अनेक ठिकाणी सदर सुरु आहे .
त्यांना अनेक शासकीय पुरस्कारांसह राज्य - राष्ट्रीय - आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाले आहेत . यात कथा - लेख - कविता - गझल - घोषवाक्य - निबंध असे विविध प्रकार आहेत . मराठी सोबत त्या हिंदीतूनही लेखन करतात . त्यातही सुनंदाताई पुरस्कृत झाल्या आहेत .
मराठी गझलक्षेत्रात " गझलनंदा " या नावाने त्या ख्यातकीर्त असून सुरेश भट यांच्या शिष्या आहेत. सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या